AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

S Sreesanth | एस श्रीसंत मैदान गाजवण्यासाठी सज्ज, ‘या’ टी 20 स्पर्धेत खेळणार

श्रीसंतने आयपीएल 2013 मध्ये शेवटचा टी -20 सामना खेळला होता.

S Sreesanth | एस श्रीसंत मैदान गाजवण्यासाठी सज्ज, 'या' टी 20 स्पर्धेत खेळणार
| Updated on: Nov 23, 2020 | 5:41 PM
Share

केरळ : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत (S Sreesanth) पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रीसंत लवकरच एका क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. श्रीसंतवर आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी 2013 मध्ये ही आजीवन बंदी टाकण्यात आली होती. मात्र 7 वर्षांनंतर म्हणजेच काही महिन्यांपूर्वी ही बंदी उठवण्यात आली. त्यामुळे श्रीसंत क्रिकेट खेळताना दिसणार आहे.faster Bowler shanthakumaran nair sreesanth ready to play in keral president t 20 cup

श्रीसंत 2020-21 मध्ये रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळणार होता. मात्र कोरोनामुळे बीसीसीआयने (BCCI) परवानगी दिली नसल्याने ही स्पर्धा खेळवण्यात आली नाही. दरम्यान पुढील वर्षातील जानेवारी 2021 मध्ये स्थानिक स्पर्धेला सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही औपचारिक माहिती किंवा घोषणा करण्यात आलेली नाही.

“केरळ प्रेसिडेंट टी-20 स्पर्धेत श्रीसंत खेळणार”

“अनेक राज्यातील क्रिकेट बोर्ड टी 20 स्पर्धेचं आयोजन करतात. या पार्श्वभूमीवर केरळ प्रेसिडेंट टी-20 कप (Kerala T 20 League) स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. श्रीसंत आगामी केरळ प्रेसिडेंट टी-20 कप स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. श्रीसंत या स्पर्धेचं आकर्षण ठरेल. या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व खेळाडू अलप्पुझा येथील होटलमध्ये बायो बबलमध्ये राहणार आहेत. या स्पर्धेचं आयोजन अलप्पुझा येथे होणार असून या स्पर्धेला पुढीलं महिन्यापासून म्हणजेच डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ड्रीम इलेव्हन ही या स्पर्धेची टायटल स्पॉन्सर असणार आहे”,अशी माहिती केरळ क्रिकेट एसोसिएशनचे अध्यक्ष सजन के वर्गीज यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना दिली.

मी कुठेही खेळायला तयार- श्रीसंत

“मला बोलवा, मी कुठेही क्रिकेट खेळायला तयार आहे. मी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेतील काही जणांच्या संपर्कात आहे. या देशात क्लब क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं माझं लक्ष्य आहे. क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर एमसीसी आणि वर्ल्ड इलेव्हनविरोधात होणाऱ्या सामन्यात खेळण्याची इच्छा आहे”, अशी प्रतिक्रिया श्रीसंतने आजीवन बंदी उठवल्यानंतर दिली होती.

एस श्रीसंतची कारकीर्द

शांताकुमार श्रीसंतने 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 37 वर्षीय श्रीसंतने टीम इंडियासाठी 53 वनडे, 27 कसोटी आणि 10 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. विशेष म्हणजे श्रीसंत 2007 च्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 च्या वन डे वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. श्रीसंतने 2007 च्या टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये मिस्बाह उल हकचा घेतलेला झेल अजूनही प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला लक्षात आहे.

संबंधित बातम्या :

मी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत

faster Bowler shanthakumaran nair sreesanth ready to play in keral president t 20 cup

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.