IND vs AUS : इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धचा प्रत्येक सामना हरणार; सांगितलं कारण

पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 66 धावांनी मात केली. त्यामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

IND vs AUS : इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धचा प्रत्येक सामना हरणार; सांगितलं कारण
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 7:55 AM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) या संघांमध्ये (Ind Vs Aus 2020) शुक्रवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 66 धावांनी मात केली. त्यामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला 375 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र निर्धारित 50 षटकांमध्ये भारताला 8 विकेट्स गमावून 308 धावाच करता आल्या. या सामन्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन म्हणाला की, विराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिन्ही प्रकारच्या मालिकांमध्ये पराभूत होईल. (Former England captain Michael Vaughan feels India will lose to Australia in all formats)

वॉनने शुक्रवारी एक ट्विट केलं, त्यात म्हटलंय की, “मला असं वाटतं की भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सर्व मालिकांमध्ये अत्यंत वाईट पद्धतीने पराभूत होईल”. वॉनला पाच गोलंदाजांसह मैदानात उतरणारा संघ आवडत नाही. ही जुनी मानिसिकता त्याला पटत नाही. त्याने म्हटलंय की, भारतीय संघ मला जुनी रणनीति फॉलो करणारा वाटला. भारताकडे केवळ पाच गोलंदाजांचा पर्याय आहे आणि भारताची फलंदाजी फार बरी नाही. भारताला 50 षटकं गोलंदाजी करण्यासाठी चार तासांहून अधिक वेळ लागला, मला हेदेखील आवडलेलं नाही. भारतीय संघाने काल बचावात्मक धोरण स्वीकारले होते. त्यांचं क्षेत्ररक्षणही फार बरं नाही. गोलंदाजी सामान्य आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन संघ मात्र जबरदस्त आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात 375 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय चांगली झाली होती. सुरुवातीच्या पाच ओव्हरमध्ये भारताने 50 रन्स केल्या. परंतु नंतर लागोपाठ विकेट्स पडत असताना शिखर धवन आणि हार्दिक पांड्याने भारताचा डाव सावरला. शिखर धवनने 86 चेंडूत 74 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने बहारदार खेळी करताना 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 76 चेंडूत 90 धावा फटकावल्या. या दोघांव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताचे स्टार फलंदाज या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. त्यामुळेच भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला. कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर हे महत्त्वाचे फलंदाज त्यांच्या नावाला साजेसा खेळ करु शकले नाहीत. आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा काढणाऱ्या मयांक अग्रवालने आक्रमक सुरुवात केली होती, परंतु त्याला मोठी खेळी करता आली आहे. मयांक 22, कोहली 21, श्रेयस 2, तर राहुल 12 धावा काढून तंबूत परतले. परिणामी भारताने कांगारुंविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना गमावला.

या सामन्यात धवन-पांड्याव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजांला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अ‌ॅडम झॅम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर जोश हेजलवूडने 3 घेऊन त्याला सुंदर साथ दिली. मायकल स्टार्कने 1 विकेट घेतली. झॅम्पाने उत्कृष्ट गोलंदाजी केली.

तत्पूर्वी, सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार अ‌ॅरॉन फिंचचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. कर्णधार अ‌ॅरॉन फिंच आणि स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) या जोडीने दमदार शतके झळकावली तर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी करत 19 चेंडूत 45 धावा फटकावल्या, तसेच सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशथक झळकावलं. फिंच-वॉर्नर-स्मिथ आणि मॅक्सवेलच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघाला हे आव्हान पेलवता आलं नाही.

संबंधित बातम्या

IND vs AUS: स्मिथने करुन दाखवलं; भारताविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात केला ‘हा’ दणदणीत रेकॉर्ड!

रोहित शर्माच्या दुखापतीवरुन गोंधळाचे वातावरण; विराट कोहलीची नाराजी

रात्रभर जागून BCCI चे नटराजन-इशांतबाबत मोठे निर्णय, रोहितच्या फिटनेसबाबत महत्त्वाची अपडेट

(Former England captain Michael Vaughan feels India will lose to Australia in all formats)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.