टीम इंडियाचा ‘हा’ माजी अष्टपैलू खेळाडू मैदानात उतरण्यास सज्ज, ‘या’ टी 20 लीगमध्ये खेळणार

इरफान पठाणने जानेवारी 2020 ला क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती.

टीम इंडियाचा 'हा' माजी अष्टपैलू खेळाडू मैदानात उतरण्यास सज्ज, 'या' टी 20 लीगमध्ये खेळणार
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 5:21 PM

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास उत्सुक आहे. श्रीलंकेत काही दिवसांनी  लंका प्रीमीयर लीगला (LPL) सुरुवात होणार आहे. इरफान या लीगमध्ये कॅंडी टस्कर्सकडून (Kandy Tuskers) खेळणार आहे. याबाबतची माहिती कॅंडी टस्कर्सचे प्रशिक्षक हसन तिलकरत्ने यांनी दिली आहे. Former India all-rounder Irfan Pathan ready to play in Sri Lanka Premier League after retirement

“मी एलपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मी टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र क्रिकेट विश्वात होणाऱ्या लीग स्पर्धेत खेळू शकतो. तसेच मी या खेळाचा आनंद घेऊ शकतो. मी आधीसारखा खेळू शकतो. मात्र यासाठी मला हळूहळू सुरुवात करावी लागेल. मी आधी सारखं खेळण्याचा प्रयत्न करेन”, असं इरफान म्हणाला.

इरफानच्याआधी मनप्रीत गोनी आणि मनविंदर बिसला या दोन्ही खेळाडूंनी कोलंबो किंग्स या संघासोबत करार केला होता. मात्र यानंतर काही कारणास्तव मनविंदरने आपलं नाव मागे घेतलं होतं. आंद्रे रसेल, फॅफ डु प्लेसी, डेव्हिड मिलर आणि डेव्हिड मलानने पण या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

एलपीएल स्पर्धेला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 21 नोव्हेंबर-13 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने पल्लेकल आणि महिंद्रा राजपक्षे आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येणार आहेत.

“इरफान आमच्या संघाकडून खेळतोय, ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इरफानमुळे आमच्या संघाला बळकटी मिळेल. तसेच त्याच्या अनुभवाचा टीममधील इतर खेळांडूंना फायदा होईल”, असं कॅंडी फ्रंचायजीचे मालक सोहेल खान म्हणाले.

कॅंडी टस्कर्समध्ये इरफान पठाण व्यतिरिक्त युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल, कुसाल परेरा, कुशाल मेंडिस, नुवान प्रदीप आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेटचा समावेश असणार आहे.

इरफान पठाणची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द

इरफान पठाणने टीम इंडियाकडून 120 एकदिवसीय, 29 कसोटी आणि 24 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. इरफानने 120 एकदिवसीय सामन्यात 1 हजार 544 धावा केल्या आहेत. तसेच 173 विकेट्स घेतल्या आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये 24 सामन्यात 172 धावांसह 28 विकेट्स मिळवल्या आहेत. तर कसोटीतील एकूण 29 मॅचेसमध्ये 1 हजार 105 धावांसह 100 बळी घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Irfan Pathan | अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचे चित्रपट सृष्टीत पदार्पण!

Happy Birthday Irfan Pathan : पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेत पाकिस्तानात धुमाकूळ, इरफान पठाणचे 5 अविस्मरणीय परफॉर्मन्स

Former India all-rounder Irfan Pathan ready to play in Sri Lanka Premier League after retirement

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.