India Tour Australia | के एल राहुलला कसोटीतही संधी, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू बीसीसीआयवर संतापला

केएल राहुलकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

India Tour Australia | के एल राहुलला कसोटीतही संधी, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू बीसीसीआयवर संतापला
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 7:56 PM

मुंबई : आयपीएल (IPL 2020) स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया (India Tour Australia) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची 26 ऑक्टोबरला घोषणा करण्यात आली. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. आयपीएलच्या 13 व्या मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल सातत्याने चांगली कामगिरी करतोय. केएलने या मोसमातील एकूण 12 सामन्यात 595 धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी दिली आहे. केएलला एकदिवसीय, टी 20 सह कसोटी मालिकेतही संधी देण्यात आले आहे. मात्र केएलच्या कसोटी मालिकेतील निवडीवरुन टीम इंडियाचा माजी खेळाडू संजय मांजरेकरने नाराजी व्यक्त केली आहे. Former India cricketer Sanjay Manjrekar angry on BCCI for KL Rahul’s inclusion in Test series against Australia

संजय मांजरेकर काय म्हणाला?

संजयने ट्विटद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. “केएलला कसोटी संघात स्थान देऊन बीसीसीआय रणजी खेळाडूंची निराशा करत आहे. रणजीमधील खेळाडू कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी कठोर मेहनत करतात”, असं ट्विट संजयने केलं आहे.

“बीसीसीआयने केएलला आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर कसोटी संघात स्थान देत चूकीचा पायंडा पाडला आहे. विशेष म्हणजे केएल याआधी कसोटी मालिकेत अपयशी ठरला आहे. यानंतरही त्याला स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे जर बीसीसीआय निराशाजनक कामगिरीनंतरही केएलला पुन्हा स्थान देत असेल, तर हे रणजी खेळाडूंचं खच्चीकरण केल्यासारखं आहे”, असंही संजयने म्हटंल.

संजयने आणखी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये केएलच्या मागील 5 कसोटी मालिकेतील सरासरी मांडली आहे. केएलने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 7.1, इंग्लंडविरुद्ध 29, वेस्टइंडीजविरुद्ध (West Indiaes Tour India) 18 , ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10.7, तर वेस्टइंडीजविरुद्ध 25.4 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. केएलला आयपीएलच्या कामगिरीच्या जोरावर कसोटीत संधी मिळतेय, तो भाग्यवान आहे. मात्र आता केएलने मिळालेल्या या संधीचं सोनं करायला हंव, यासाठी केएलला शुभेच्छा, असं दुसऱ्या ट्विटमध्ये संजयने म्हटलं आहे.

राहुलने अखेरचा कसोटी सामना किंग्स्टन येथे वेस्टइंडिजविरुद्ध ऑगस्ट 2019 मध्ये खेळला होता. केएलने आतापर्यंत 36 कसोटी सामन्यातील 60 डावांमध्ये 34.59 च्या सरासरीने 2 हजार 6 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. केएलने 26 डिसेंबर 2014 मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील कामगिरी

केएल राहुलने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात एकूण 12 सामन्यात 59.50 च्या सरासरीने आणि 132.22 च्या स्ट्राईक रेटने 595 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 52 चौकार आणि 20 सिक्स लगावले आहेत. तर 5 अर्धशतक आणि 1 शतकी खेळीचा समावेश आहे. दरम्यान केएल ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी -20 सीरिजमध्ये उपकर्णधार पदाची जबाबदारी सांभळणार आहे.

संबंधित बातम्या :

IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

India Tour Australia | रोहितला काय झालंय हे चाहत्यांना कळू द्या, सुनील गावसकर कडाडले

Former India cricketer Sanjay Manjrekar angry on BCCI for KL Rahul’s inclusion in Test series against Australia

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.