Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 | आशिष नेहराची आयपीएल 2020 मधील बेस्ट टीम, विराट-धवनला स्थान नाही

नेहराने आपल्या टीममध्ये मुंबईच्या सर्वाधिक 4 खेळाडूंना स्थान दिलं आहे.

IPL 2020 | आशिष नेहराची आयपीएल 2020 मधील बेस्ट टीम, विराट-धवनला स्थान नाही
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 11:33 AM

मुंबई : आयपीएलचा 13 वा मोसम (IPL 2020) पार पडल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटू या मोसमातील आपली बेस्ट टीम निवडत आहे. आयपीएलच्या या मोसमात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आपल्या ड्रीम प्लेइंग इलेव्हन संघात (IPL BEST TEAM 2020) स्थान दिलं जात आहे. याआधी आतापर्यंत वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag), अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि इरफान पठाण (Irfan Pathan) यासारख्या माजी खेळाडूंनी आयपीएलच्या 13 व्या मोसमातील बेस्ट टीम निवडली. दरम्यान आता टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने (Ashish Nehra) आपली प्लेइंग इलेव्हन टीम निवडली आहे. स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात नेहराने टीम निवडली. नेहराने पर्पल कॅपचा मानकरी ठरलेल्या कगिसो रबाडाला (Purple Cap HOlder Kagiso Rabada 2020) आपल्या संघात स्थान दिलेलं नाही. तसेच गब्बर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीलाही (Virat Kohli) समाविष्ट केलेलं नाही. Former Team India fast bowler Ashish Nehra selects Dream Playing XI for IPL 2020

अशी आहे टीम

नेहराने सलामीवीर म्हणून पंजाबचा कर्णधार केएल राहुल (K L Rahul) आणि हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) या दोघांना स्थान दिलंय. केएल हा या मोसमातील ऑरेंज कॅप होल्डर ठरला होता. तसेच वॉर्नरनेही धमाकेदार खेळी केली होती. वॉर्नरने या मोसमात 500 पेक्षा अधिक धावा केल्या. नेहराने तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) स्थान दिलंय. गेल्या 3 मोसमापासून सूर्यकुमार मुंबईसाठी धमाकेदार कामगिरी करतोय. चौथ्या क्रमांकावर मिस्टर 360 एबी डी व्हीलियर्सला (AB DE Villiars) संधी मिळाली आहे. नेहराने मुंबईच्या ईशान किशनला (Ishan Kishan) पाचव्या क्रमांकासाठी पसंती दिली आहे.

सहाव्या क्रमांकावर ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) संधी मिळाली आहे. हार्दिकने या मोसमात गोलंदाजी केली नाही. मात्र हार्दिकने निर्णायक क्षणी फटकेबाजी केली. नेहराने वेगवान गोलंदाज म्हणून राजस्थानच्या जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि मुंबईच्या जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah)स्थान दिलंय. तर फिरकीची धुरा हैदराबादच्या राशिद खान (Rashid Khan) आणि बंगळुरुच्या युजवेंद्र चहलकडे (Yuzvendra Chahal) देण्यात आली आहे. तर नेहराने अकरावा खेळाडू म्हणून रवीचंद्रन आश्विन (Ravichandran Ashwin) आणि मोहम्मद शमी (Mohhmed Shami) या दोघांपैकी एकाला पसंती देणार आहे.

आशिष नेहराची आयपीएल 2020 बेस्ट टीम : के एल राहुल, डेव्हिड वॉर्नर, सूर्यकुमार यादव, एबी डीव्हीलियर्स, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह , राशिद खान, युजवेंद्र चहल, आणि रविचंद्रन अश्विन/मोहम्मद शमी.

वीरेंद्र सेहवागची टीम : केएल राहुल, देवदत्त पडीक्कल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली(कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एबी डी व्हीलियर्स, राशिद खान, युजवेंद्र चहल, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी, ईशान किशन(12वा खेळाडू)

इरफान पठाणची आयपीएल 2020 टीम : कायरन पोलार्ड (कर्णधार) केएल राहुल, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, मार्कस स्टॉयनिस, राहुल तेवातिया, युजवेंद्र चहल, कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.

हर्षा भोगलेची टीम : हर्षा भोगले यांची ड्रिम आयपीएल टीम : के. एल. राहुल, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जोफ्रा आर्चर, राशिद खान, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाणची ड्रीम टीम, रोहित-विराटला डच्चू, पोलार्ड कर्णधारपदी

IPL 2020 | नजफगढचा नवाब वीरेंद्र सेहवागची आयपीएल 2020 मधील ड्रीम टीम, ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी निवड

हर्षा भोगले यांची IPL 2020 मधील ड्रिम टीम तयार, संघात रोहित-विराटसह पर्पल कॅप विजेत्याला स्थान नाही

Former Team India fast bowler Ashish Nehra selects Dream Playing XI for IPL 2020

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.