Jasprit Bumrah | बुमराह आयपीएलच्या 13 व्या मोसमापासून सलग खेळतोय, त्याला विश्रांती द्या : गौतम गंभीर
इंग्लंडचा संघ फेब्रुवारीत भारत दौऱ्यावर येणार आहे. बुमराहला या इंग्लंडविरोधातील मालिकेत विश्रांती द्यावी, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाच्या माजी खेळाडूने दिली आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 4th Test) यांच्यात बॉर्डर गावसकर मालिकेतील (Border Gavskar Trophy) चौथा सामना 15 जानेवारीपासून खेळण्यात येणार आहे. याआधीच्या 3 कसोटींमध्ये टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर पडावे लागले. दरम्यान चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) खेळणार की नाही,याबाबतीत अजूनही अनिश्चितता आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरोधात खेळणार आहे. इंग्लंडचा संघ भारतात (England Tour India 2021) येणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया इंग्लंडविरोधात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या इंग्लंडविरोधातील मालिकेत बुमराहला विश्रांती देण्यात यावी, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) दिली आहे. (Give rest to Jaspreet Bumrah in the series against England said Gautam Gambhir)
गंभीर काय म्हणाला?
फेब्रुवारीपासून टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दौऱ्याला सुरुवात होत आहे. या कसोटी मालिकेसाठी बुमराहला विश्रांती द्यायला हवी. बीसीसीआयने बुमराहची जपणूक करायला हवी. बुमराह आयपीएलच्या 13 व्या मोसमापासून सलग खेळतोय. यामुळे सिडनी कसोटीत बुमराहच्या फिटनेसचा प्रश्न उपस्थित झाला. यामुळे बुमराहला विश्रांती मिळायला हवी, असं गंभीर म्हणाला. गंभीर स्टार स्पोर्टसह बोलत होता.
“बुमराहकडे लक्ष द्यायला हवं”
बुमराह टीम इंडियाचं भविष्यात नेतृत्व करणार आहे. बुमराह टीम इंडियाच्या गोलंदाजीचा कणा आहे. तो महत्वाचा गोलंदाज आहे. यामुळे बुमराहकडे अधिक लक्ष द्यायला हवं. इशांत शर्माआणि उमेश यादव हे दुखापतग्रस्त आहेत. याबाबत मला कल्पना आहे. मात्र तरीही इंग्लंडविरोधात खेळायला सांगणं, हे बुमराहवर अन्यायकारक ठरेल, असं गंभीरने नमूद केलं.
बुमराहने 2018 मध्ये कसोटी पदार्पण केलं. तेव्हापासून त्याने एकूण 17 कसोटी सामने खेळला आहे. मात्र त्याने एकही कसोटी भारतात खेळला नाही. बीसीसीआयने बुमराहची नक्कीच काळजी घेतली असेल. बुमराह इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात खेळला आहे. बुमराह परदेशात घातक गोलंदाज ठरला आहे. भारतात गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग करण्यास खेळपट्ट्यांकडून मदत मिळते. यामुळे बुमराह विरोधी संघांसाठी आणखी धोकादायक ठरेल, असा विश्वास गंभीरने यावेळेस व्यक्त केला.
सामन्याआधी बुमराहचं ठरणार
बुमराहच्या चौथ्या कसोटीत खेळणार की नाही, याबाबत अजून काहीच ठरलेलं नाही. बुमराहची 15 जानेवारीला सामन्याआधी फिटनेस टेस्ट घेण्यात येईल. बुमराह खेळणार की नाही, हे या फिटनेस टेस्टवर अवलंबून असेल, अशी माहिती टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोर यांनी दिली.
संबंधित बातम्या :
Aus vs India 4 Th Test | बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार की नाही? प्रशिक्षक विक्रम राठोर म्हणाले…
Aus vs Ind, 4th Test | ब्रिस्बेन कांगारुंचा बालेकिल्ला, टीम इंडियाला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी
(Give rest to Jaspreet Bumrah in the series against England said Gautam Gambhir)