ओ अजनबी…! गाणं गाताना पाहूनच हरभजननं गीता बसराला केलं आपलंस, मित्राला सांगितलं आणि…

भारतीय संघाचा मिस्टर टर्बनेटर हरभजन सिंगनं क्रिकेट कारकिर्दीत जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आहे. क्रिकेटप्रमाणेच त्याची वैयक्तिक आयुष्यही तितकं इंटरेस्टिंग आहे. गीता बसरा आणि त्याच्या प्रेमाचे किस्से कायमच चर्चेत राहिले आहेत.

ओ अजनबी...! गाणं गाताना पाहूनच हरभजननं गीता बसराला केलं आपलंस, मित्राला सांगितलं आणि...
हरभजन सिंग आणि गीता बसरा यांच्या लग्नाची गोष्टImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 8:20 PM

मुंबई: फिरकीपटू हरभजन सिंग भारतीय संघात मोलाची कामगिरी बजावली. आपल्या गोलंदाजीवर विरोधी संघाच्या खेळाडूंना नाचवलं आहे. असं असताना गीता बसरानं आपल्या सौंदर्याने हरभजन सिंगला क्लिन बोल्ड केलं आहे. या दोघांची लव्हस्टोरी एकदम खास आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल गीता बसरा यांची लव्हस्टोरी लंडनमध्ये सुरु झाली असं म्हणावं लागेल. हरभजन लंडनला क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. त्या दरम्यान त्याने गीता बसराचं एक व्हिडीओ साँग पाहिलं होतं. तेव्हा तो तिच्या अदानी घायाल झाला होता. टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याने आपल्या एका मित्राला गीताबाबत विचारलं. त्याच्याकडून तिचा नंबर घेतला आणि गीताला मेसेज केला. मात्र गीता त्याला ओळखत नसल्याने तिने त्याच्या मेसेजचा रिप्लाय दिला नाही. त्यानंतर ओळख झाली आणि 8 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.

फोन केला तेव्हा काय म्हणाली होती गीता

“टी 20 वर्ल्डकप जिंकून आल्यानंतर सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. मी या आनंदी क्षणात गीताला फोन केला. तेव्हा ती म्हणाली कोण बोलतोय. त्यानंतर मी तिचा पाठलाग करत राहिलो आणि मला यश मिळालं.” असं हरभजननं सांगितलं. 2007 मध्ये आयपीएल स्पर्धेदरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती. 2008 मध्ये हरभजन सिंगने ‘एक हसीना, एक खिलाडी’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोच्या प्रमोशनदरम्यान हरभजन आणि गीता एका हॉटेलमध्ये स्पॉट झाले होते. गीताने त्यावेळी ‘आम्ही फक्त चांगले मित्र आहोत’ असे म्हटले होते. “जेव्हा द ट्रेन चित्रपट रिलीज झाला तेव्हा माझी आणि हरभजनची ओळख झाली. तेव्हा मी करिअरवर फोकस करत होती. तेव्हा आम्हाला एकत्र फिरताना लोकांना वाटायचं की आम्ही डेट करत आहोत. पण आम्ही चांगले मित्र होतो. त्यानंतर आठ वर्षांनी आम्ही लग्न केलं.”

हरभजन आणि गीताने 19 ऑक्टोबर 2015 रोजी लग्न केलं. जालंधरमध्ये पारंपरिक पद्धतीने दोघांचं लग्न पार पडलं. लग्नाच्या एका वर्षानंतर गीतानं मुलीला जन्म दिला. गीतानं बॉलिवूडमध्ये 2006 मध्ये डेब्यू केलं होतं. 10 वर्षांच्या करिअरमध्ये तिने एकूण 6 चित्रपटात काम केलं. यात द ट्रेन, जिला गाजियाबाद, मिस्टर जो बी कार्वल्हो, सेकंड हँड हसबंड आणि पंजाबी फिल्म लॉकमध्ये काम केलं आहे.

हरभजन सिंगची क्रिकेट कारकिर्द

हरभजन सिंगनं 103 कसोटी, 236 एकदिवसीय, 28 टी 20 आणि 163 आयपीएल सामने खेळला आहे. कसोटीत दोन शतकं ठोकली आहेत. हरभजनने कसोटीत 417, एकदिवसीय सामन्यात 269, टी 20 सामन्यात 25 तर आयपीएल 150 गडी बाद केले आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.