IND vs NZ : T20 मालिकेपूर्वी हार्दिक पांड्या आणि केन विल्यमसन न्यूझिलंडच्या रस्त्यावर रिक्षा चालवताना दिसले
T20 विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू चालवतोय रिक्षा, VIDEO व्हायरल
मुंबई : टीम इंडिया (IND) आणि न्यूझिलंड टीमचा (NZ) विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये पराभव झाला. त्यानंतर दोन्ही टीमचे चाहते सोशल मीडियावर निराश झाल्याचे पाहायला मिळाले होते. ऑस्ट्रेलियातून टीम इंडिया न्यूझिलंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. न्यूझिलंड आणि टीम इंडिया यांच्यामध्ये T20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. दोन दिवसांनी T20 मालिकेचा पहिला सामना होणार आहे. त्यापुर्वी हार्दिक पांड्या आणि केन विल्यमसन रिक्षा चालवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
T20 मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व हार्दीक पांड्याकडे देण्यात आलं आहे. तर प्रशिक्षक राहूल द्रविड ऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण याला न्यूझिलंड दौऱ्यासाठी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. हार्दीक पांड्या कोणत्या खेळाडूकडून ओपनिंग करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण टीम इंडियात मोठा बदल झाला असून नवे खेळाडू मैदानात दिसणार आहेत.
हार्दीक पांड्या आणि केन विलियमसन यांनी टी20 मालिका सुरु होण्यापुर्वी ‘क्रोकोडाइल बाइक’चालवली आहे. दोघांनी वेलिंग्टनच्या रस्त्यावर बाईक चालवली आहे. विशेष म्हणजे हा व्हि़डीओ ‘ब्लैककैप्स’ने इंस्टाग्राम अकाऊंटवरती शेअर केला आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी दोघांनी रिक्षा चालवली त्यावेळी टीम जर्सी घातली होती.
View this post on Instagram
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत, शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र, चहलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
शिखर धवन, ऋषभ पंत, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.