‘त्या’ महिला क्रिकेटपटूने जिंकलं हार्दिक पांड्याला; हार्दिककडून खास गिफ्ट काय?
आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सच्या कमकुवत कामगिरी असतानाही, हार्दिक पांड्याने महिला प्रीमियर लीग 2025 मध्ये भेटलेल्या तरुण ऑलराऊंडर काशवी गौतमला स्वतःच्या स्वाक्षरी असलेली बॅट भेट दिली आहे. काशवीची टीम इंडियात निवड झाल्याने हार्दिकने दिलेलं आश्वासन पूर्ण केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि हार्दिकचे कौतुक केले जात आहे.

आयपीएल 2025मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स टीमने सुरुवात काही चांगली केलेली नाही. आता पर्यंतच्या पाच सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात हार्दिक पांड्याच्या संघाला यश मिळवता आलं आहे. हार्दिकच्या संघावर पराजयाच्या लाटांवर लाटा धडकत असल्या तरी सोशल मीडियावर मात्र एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो एका महिला क्रिकेटरसोबत दिसत आहे. ही भारतीय महिला क्रिकेटर आहे. या महिला क्रिकेटरला हार्दिक महिला प्रीमियर लीग 2025मध्ये भेटला होता. त्यावेळी त्याने या महिला क्रिकेटपटूला एक आश्वासन दिलं होतं. ते आता पूर्ण केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हार्दिक पांड्यासोबत युवा ऑलराऊंडर खेळाडू काशवी गौतम दिसत आहे. काशवी गौतम महिला प्रीमियर लीग 2025मध्ये गुजरात टायटन्स टीमची भाग होती. हार्दिकने काशवी गौतमला त्याची बॅट गिफ्ट म्हणून दिली आहे. या बॅटवर त्याने सही केली आहे. तसेच टीम इंडियात निवड झाल्याबद्दल हार्दिकने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. काशवी पहिल्यांदाच टीममध्ये सिलेक्ट झाली आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर प्रतिक्रिया येत असून हार्दिकचं कौतुक केलं जात आहे.
वाचा: सासूने जावयासोबत पळून जाण्याचा बनवला मास्टर प्लान, नवऱ्याला कळालं अन्…
अन् आश्वासन पूर्ण केलं
महिला प्रीमियर लीग 2025चा एक एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स दरम्यान खेळवण्यात आला होता. या सामन्यानंतर गुजरात जायंटस टीमची खेळाडू हरलीन देओलने काशवी गौतमची हार्दिक सोबत ओळख करून दिली होती. काशवी तुमची मोठी फॅन असल्याचं हरलीनने हार्दिकला सांगितलं होतं. तेव्हा काशवीला एक स्पेशल बॅट भेट देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता हार्दिकने त्याचं आश्वासन पूर्ण केलं आहे. त्याचाच हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पहिल्यांदाच टीम इंडियात
27 एप्रिल ते 11 मेपर्यंत श्रीलंकेत ट्राय सीरिज होणार आहे. या सीरिजसाठी काशवी गौतमची निवड करण्यात आली आहे. तिने महिला प्रीमियर लीग 2025मध्ये आपला ठसा उमटवला होता. काशवीने या लीगमध्ये 9 सामन्यात 11 बळी घेतले होते. टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी ती महिला क्रिकेटर ठरली होती. त्याशिवाय ती चांगली फलंदाजीही करते. चौकार, षटकार लगावण्यात तिचा हातखंडा आहे. काशवी ही चंदीगडची राहणारी आहे. चंदीगडच्या एखाद्या महिला क्रिकेटरचा भारतीय संघात समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
