Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या हातात पाकिस्तानचा GDP; मनगटी घड्याळच 16 कोटी, कमेंटचा पडला पाऊस

Hardik Pandya Philippe Nautilus : क्रिकेटर हार्दिक पांड्या याने हातत 16 कोटी रुपयांची आलिशान घड्याळ घातली आहे. त्याने याचा एक फोटो पण इन्साग्रामवर शेअर केला. त्यानंतर त्याच्या या छायाचित्रावर कमेंटचा पाऊस पडला. घडाळ्याची किंमत ऐकून काहींनी इतका तर पाकिस्तानचा GDP असल्याचा चिमटा काढला.

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या हातात पाकिस्तानचा GDP; मनगटी घड्याळच 16 कोटी, कमेंटचा पडला पाऊस
फोटोवर पडला कमेंटचा पाऊस
Follow us
| Updated on: Aug 27, 2024 | 2:13 PM

टीम इंडिया ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने सोमवारी त्याच्या इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केले. हा फोटो लागलीच व्हायरल झाला. त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला. हार्दिक पांड्या याने हातात जगातील लक्झिरियस घड्याळ घातल्याचे दिसते. हार्दिक पांड्या या छायाचित्रात प्रसन्न मुद्रेत दिसतो. हासताना दिसतो. या हसऱ्या चेहऱ्यामागे अनेक दुःख लपल्याची कमेंट चाहत्यांनी केली आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांचा घटस्फोट झाला. त्याचा मुलगा पण पत्नीसोबत आहे. त्यानंतर त्याची छायाचित्र सोशल मीडियावर आली आहेत. या छायाचित्रातील महागड्या घडाळ्यावरुन चाहते पाकिस्तानची खेचताना दिसले.

16 कोटींचे घड्याळ

हार्दिक पांड्याची घड्याळ सध्या चर्चेत आहे. कारण ही घड्याळ दोन लाख, चार लाख, दोन कोटी, चार कोटींची नाही. तर 16 कोटी रुपयांची आहे. या घड्याळाचे नाव प्लॅटिनम पॅटेक फिलिप नॉटिलिस असे आहे. या घड्याळाच्या बेझेलभोवती 32 बॅगेट कट पन्ना तर तासाच्या चिन्हावर 12 बॅगेट कट पन्ना आहे. त्यामुळेच ही घड्याळ अगदी महाग आहे. हार्दिक पांड्याकडे ही घड्याळ अनेक दिवसांपासून आहे. यापूर्वी सुद्धा त्याच्या हातात हे महागडं मॉडेल दिसले.

हे सुद्धा वाचा

भावाच्या उजव्या हातात पाकिस्तानचा जीडीपी

या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला आहे. त्यातील काही कमेंटमध्ये पाकिस्तानला चाहत्यांनी टोला हाणला आहे. प्लॅटिनम पॅटेक फिलिप नॉटिलिस ही बेशकिंमती घड्याळ हार्दिक पांड्याच्या हातात आहे. तिची किंमत 16 कोटींच्या घरात आहे. त्यावरुन एकाने पाकिस्तानचा जीडीपी भावाच्या उजव्या हातात असल्याची कमेंट केली आहे. अर्थात पाकिस्तानचे या वर्षातील सकल उत्पन्न हे 347.17 अब्जावधी अमेरिकन डॉलर इतके पोहचण्याची शक्यता आहे.

त्याला तर वेळ दाखवून द्यायची होती

हार्दिक पांड्याच्या आयुष्यात अनेक वादळं आली. त्याचे वैवाहिक जीवन क्षणभंगूर ठरले. घटस्फोट झाला. मुलगा पत्नीकडे आहे. त्याला मुंबई इंडियन्समध्ये चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. या सर्व घडामोडीनंतर त्याच्या फोटोवर एका चाहत्याने छान कमेंट केली. सरला त्याची वेळ दाखवून द्यायची होती, अशी कमेंट त्याने केली. तर एकाने अशा 20 येतील आणि तितक्याच जातील, या भटक्या आत्मा आहेत, अशी कमेंट करत त्याची पूर्व पत्नी नताशावर निशाणा साधला आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.