WATCH: षटकार मारताच ‘सुपरमॅन’ सारखा खेळाडू धावला, अशी फिल्डिंग तुम्ही कधी पाहिली आहे का ?
सेम टू सेम 'सुपरमॅन' सारखा पकडला कॅच, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई : क्रिकेटच्या मैदानातील व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ असे असतात की, ते नेहमी पाहावेसे वाटतात. ऑस्ट्रेलिया (AUS) आणि इंग्लंड (ENG) यांच्या मॅचमधील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू एश्टन एगरने अशी फिल्डींग केली आहे, चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर एश्टन एगर याचा आहे. ऑस्ट्रेलियाचा कमिंस हा 45 वी ओव्हर टाकत होता. त्यावेळी इंग्लंडचा खेळाडू डेविड मलान एक जोरदार शॉट मारला. एश्टन एगर हा बाउंड्री लाइनच्या जवळ उभा होता. चेंडूचा अंदाज घेत एश्टन एगरने सुपरमॅन सारखी झेप घेतली. कॅच हातात पकडला, बाउंड्री लाइनवर पडण्याच्या आगोदर चेंडू मैदानात फेकला. त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांनी त्याचं अधिक कौतुक केलं आहे.
That’s crazy!
Take a bow, Ashton Agar #AUSvENG pic.twitter.com/FJTRiiI9ou
— cricket.com.au (@cricketcomau) November 17, 2022
क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामध्ये कशापद्धतीने झेल घेतला आहे हे दिसत आहे. या व्हिडीओ शेअर करताना. आशयामध्ये हे खूप खतरनाक आहे असं लिहिलं आहे. 74 हजारपेक्षा अधिक लोकांनी त्या व्हिडीओला कमेंट केली आहे. 400 पेक्षा अधिक लोकांनी रिट्वीट केलं आहे.