Rohit Sharma | एकही सामना न खेळता हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम

रोहित शर्माला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय आणि टी 20 मालिकेला मुकावे लागले.

Rohit Sharma | एकही सामना न खेळता हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 12:21 PM

कॅनबेरा : टीम इंडियाने शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या सामन्यात (India Beat Australia by 13 run in 3rd odi) कांगारुंवर 13 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने लाज राखली. ऑस्ट्रेलियाने 2-1 च्या फरकाने मालिका जिंकली. टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापतीमुळे या एकदिवसीय मालिकेला मुकावे लागलं. मात्र यानंतरही रोहितने विक्रम केला आहे. विशेष म्हणजे रोहित 2013 पासून टीम इंडियाकडून सर्वोच्च धावसंख्या करतोय. hitman rohit sharma highest odi score for 2020 team india

काय आहे विक्रम?

टीम इंडियाकडून 2020 या वर्षात एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहितने केला आहे. विशेष म्हणजे रोहित टीम इंडियाकडून सलग 8 वर्ष सर्वोच्च धावसंख्या करणारा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेत कोणत्याच खेळाडूला शतकी खेळी करता आली नाही. हे रोहितच्या पथ्यावर पडलं आहे. यामुळे रोहित सलग 8व्या वर्षी टीम इंडियाकडून सर्वोच्च धावसंख्या करणारा फलंदाज ठरला आहे. रोहितची 119 ही या 2020 वर्षातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. म्हणजेच टीम इंडियाकडून या वर्षात रोहित सर्वोच्च धावसंख्या करणारा फलंदाज ठरला. रोहितने 119 धावांची खेळी 19 जानेवारीला न्यूझीलंडविरोधात केली होती. रोहितने या वर्षात केवळ एकूण 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

रोहितची वर्षनिहाय सर्वोच्च धावसंख्या

2013 – 209

2014 – 264

2015 – 150

2016 – 171*

2017 – 208*

2018 – 152

2019 – 159

2020 – 119

3 वनडेत 171 धावा

रोहितने या वर्षात एकूण 3 एकदिवसीय सामने खेळले. या वर्षातील पहिला सामना रोहित ऑस्ट्रेलियाविरोधात खेळला होता. या सामन्यात रोहित अपयशी ठरला. रोहितने या सामन्यात 15 चेंडूत 10 धावाच केल्या. दुसऱ्या सामन्यात रोहितने 44 चेंडूत  42 धावा केल्या. तर तिसऱ्या सामन्यात रोहितने धमाका केला. रोहितने या सामन्यात शतकी कामगिरी केली. या सामन्यात त्याने 128 चेंडूत 119 धावांची शतकी खेळी केली. अशाप्रकारे रोहितने एकूण 3 सामन्यात 171 धावा केल्या.

11 डिसेंबरला चाचणी

रोहितला दुखापतीमुळे एकदिवसीय, टी 20 मालिकेला मुकावे लागले. यानंतर रोहित कसोटी मालिकेत खेळणार की नाही हे 11 डिसेंबरला ठरणार आहे. रोहितची 11 तारखेला फिटनेस चाचणी होणार आहे. म्हणजेच रोहित दुखापतीतून सावरला आहे की नाही, हे पाहण्यासाठी एक चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर रोहित कसोटी मालिकेत खेळणार की नाही हे ठरणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

….म्हणून रोहित ऑस्ट्रेलियाला न जाता मुंबईत

आयपीएलचा 13 वा मोसम 11 नोव्हेंबरला संपला. यानंतर टीम इंडिया दूबईहून परस्पर ऑस्ट्रेलियाला निघाली. मात्र रोहित मुंबईला आला. रोहितच्या वडिलांना कोरोना झाला. त्यामुळे रोहित मुंबईला आला, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

संबंधित बातम्या : 

रात्रभर जागून BCCI चे नटराजन-इशांतबाबत मोठे निर्णय, रोहितच्या फिटनेसबाबत महत्त्वाची अपडेट

hitman rohit sharma highest odi score for 2020 team india

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.