Explained: Rafael nadal लाल मातीचा बादशाह का आहे? त्याला तिथे हरवण मुश्किल का आहे? समजून घ्या….

फ्रेंच ओपन म्हटलं की, राफेल नदालच नाव समोर येतं. इथे नदालच्या वर्चस्वाला आव्हान देणं, कोणालाही जमलेलं नाही. 2005 पासून क्ले कोर्टवर नदालचच राज्य आहे. एक खेळाडू एकाच स्पर्धेमध्ये इतका यशस्वी कसा? त्याला का कोणी हरवू शकत नाही? ते समजून घ्या....

Explained: Rafael nadal लाल मातीचा बादशाह का आहे? त्याला तिथे हरवण मुश्किल का आहे? समजून घ्या....
French open champion Rafael nadal Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 6:58 PM

फ्रेंच ओपन (French open) आणि राफेल नदाल (Rafael Nadal) यांचं एक वेगळ नातं आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेत राफेल नदाल या नावाचा दबदबा आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेला आता नदाल ओपन म्हटल्यासही चुकीच ठरणार नाही. कारण नदालची या स्पर्धेतील कामगिरीच तशी आहे. फ्रेंच ओपन स्पर्धा ही क्ले कोर्टवर (Clay Court) खेळली जाते आणि नदाल या कोर्टचा राजा आहे. कारण आतापर्यंत त्याने फ्रेंच ओपनची तब्बल 14 विजेतेपद पटकावली आहेत. एकूण करीयरमध्ये राफेल नदालच्या नावावर 22 ग्रँडस्लॅम विजेतेपद आहेत. त्यातली 14 एकट्या फ्रेंच ओपनची आहेत. कालही नदाल फायनलमध्ये चॅम्पियनसारखा खेळला. त्याने 23 वर्षाच्या कॅस्पर रुदला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. पहिल्या गेमपासून त्याने कोर्टवर राज्य केलं. नदालने कॅस्पर रुदवर 6-3 6-3 6-0 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. फायनलचा सामना रंगतदार होईल, ही चाहत्यांची अपेक्षा फोल ठरली. अगदीच एकतर्फी सामना झाला. कॅस्पर रुद राफेल नदालसमोर पुरता निष्प्रभ ठरला. त्याला काहीच करता आलं नाही. ही अंतिम लढत नसून साखळी फेरीतील सामना वाटला. राफेल नदाल आतापर्यंत एकदाही फ्रेंच ओपनची फायनल हरलेला नाही. कालही त्याने तोच सिलसिला कायम राखला. राफेल नदालच्या बरोबरीने रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच ही सुद्धा टेनिसमधली मोठी नाव आहेत. टेनिसच्या बहुतांश स्पर्धांमध्ये विजेतेपद या तिघांमध्येच विभागलेली दिसतील. पण फ्रेंच ओपन म्हटलं की, राफेल नदालच नाव समोर येतं. इथे नदालच्या वर्चस्वाला आव्हान देणं, कोणालाही जमलेलं नाही. 2005 पासून क्ले कोर्टवर नदालचच राज्य आहे. एक खेळाडू एकाच स्पर्धेमध्ये इतका यशस्वी कसा? त्याला का कोणी हरवू शकत नाही? ते समजून घ्या….

घरच्या मैदानासारखा क्ले कोर्ट

स्पेनच्या लोकांना उबदार वातवरण आवडत. फ्रेंच ओपनचे सामने युरोपमध्ये होतात, तेव्हा इथे वातावरणात उष्णता असते. गर्मीमध्ये क्ले कोर्ट अजून टणक होतं. त्यामुळे चेंडूला जास्त बाऊन्स मिळतो. नदालची खेळण्याच्या स्टाइलला हे वातावरण एकदम अनुकूल आहे. थंड आणि ह्यूमिड वातावरणाक नदालच्या सामन्यांचा निकाल तुम्हाला वेगळा दिसेल. स्पेनमध्ये नदालने अशाच प्रकारच्या कोर्टवर जास्त सराव केलाय. त्यामुळे फ्रेंच ओपनमध्ये त्याचा खेळ अधिक बहरतो. क्ले कोर्टचा सरफेस ग्रास आणि हार्ड सरफेसच्या तुलनेत मंद असतो. त्यामुळे चेंडूला जास्त उसळी मिळते. खेळाडूंना विचार करायला थोडा जास्त वेळ मिळतो. नदाल चेंडूला जास्त ताकत आणि अचूकतेने हिट करतो.

क्ले कोर्टवर नदाल जास्त वेगात खेळतो

राफेल नदाल त्याचा वेग आणि कोर्ट कव्हर करण्यासाठी ओळखला जातो. नदाल समोरच्याला चूका करण्यासाठी भाग पाडणारे शॉट्स खेळतो. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याचा वेग कमी झालाय. पण क्ले कोर्टवर बाकी प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत नदालचा वेग जास्त असतो. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत नदाल क्ले कोर्ट जास्त कव्हर करतो.

क्ले कोर्टवर संयम आवश्यक, तोच नदालकडे भरपूर आहे

नदालमध्ये पेशन्स म्हणजे भरपूर संयम आहे, जो कोर्टवर दिसतो. अनेकदा रॅली जास्त वेळ चालते. त्यावेळी खेळाडून संयम दाखवण खूप आवश्यक असतो. नदाल अनेकदा मोठ्या रॅली दरम्यान आपला संयम सुटू देत नाही. तो समोरच्या खेळाडूला पळवतो आणि दमवतो. तो प्रत्येक पॉइंटसाठी खूप मेहनत घेतो. पॉइंट मिळवण्यासाठी तो योग्य संधीची वाटही पाहतो. कोर्टवर त्याचं डोकं शांत असतं. दबावाखाली तो कधी आपला संयम सुटू देत नाही.

नदालचा मजबूत फोरहँडचा फटका

राफेल नदालचा फोरहँडचा फटका त्याच्या बॅकहँडपेक्षा जास्त ताकदवान आहे. क्लेकोर्टवर नदाल आपले अँगल आणि शॉट्स बदलण्यासाठी माहीर आहे. तीच त्याची खरी ताकत आहे. प्रतिस्पर्धी त्याच्या याच खेळामुळे अनेकदा अडचणीत येतात.

नदालचा टॉप स्पिन

क्ले कोर्टवर चेंडू जास्त स्पिन होतो. नदालची फोरहँड खेळण्याची एक पद्धत आहे. ज्यामुळे तो टॉप स्पिन करण्यात यशस्वी होतो. फोरहँडचा शॉट खेळताना, तो खालून वरती हिट करतो. त्यामुळे चेंडू नेटला लागण्याची शक्यता कमी असते. चेंडू कोर्टच्या बेसलाइन जवळ जातो. तिथे घसरण असल्यामुळे खेळणं सोपं नसतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.