आयपीएल, प्रो कबड्डीच्या धर्तीवर देशी खेळांना लोकप्रियता कशी मिळवून देणार?, अजित पवार म्हणतात…

देशाचं नाव मोठं करायचं असेल, तर आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशिक्षण केंद्र आपल्याला तयार करावी लागतील, असं मतं अजित पवार यांनी व्यक्त केलं.

आयपीएल, प्रो कबड्डीच्या धर्तीवर देशी खेळांना लोकप्रियता कशी मिळवून देणार?, अजित पवार म्हणतात...
अजित पवार
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 11:24 PM

पुणे : अजित पवार म्हणाले, राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी खेळ गरजेचे आहे. समाजमन आणि आरोग्य सुदृढ करण्याचं काम खेळाडूंच्या माध्यमातून होतं. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री येणाऱ्या काळात क्रीडा या क्षेत्राकडं आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागेल. खेळाच्या संबंधित निर्णय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री यांना विनंती करायची आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन बालेवाडीत होणार आहे. याची फाईल गेल्या अनेक महिन्यांपासून पडून आहे. हे भवन लवकर व्हावं, अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.

राजकारण असो किंवा क्रीडा स्पर्धा दोन्हीकडं निकोप वातावरण असलं पाहिजे. वातावरण निकोप असेल तर चांगलं घडविता येतं. महाराष्ट्राच्या विकासाच्या आड राजकारण येता कामा नये, अशी विनंतीही अजित पवार यांनी केली.

राज्यानं स्वतंत्र क्रीडा धोरणं स्वीकारलं आहे. क्रीडा मंत्री या नात्यानं गिरीश महाराज यांनापण क्रीडेबद्दल आवड आहे. ५ टक्के जागा खेळाडूंसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात नंबर वन आहे. सातत्य टीकलं पाहिजे. १९ कोटी रुपये मागे दिले होते. राज्याचं देशाचं नाव मोठं करायचं असेल, तर आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशिक्षण केंद्र आपल्याला तयार करावी लागतील, असं मतं अजित पवार यांनी व्यक्त केलं.

राज्यात विभागीय क्रीडा संकुलं झालीत. जिल्हा क्रीडा संकुल झालीत. तालुका क्रीडा संकुल होत आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेत पदकं मिळवायची असतील तर तसे प्रशिक्षकही उपलब्ध झाले पाहिजे, असंही ते म्हणाले.

मलखांब, योगा, स्केटिंगमध्ये पदकं जास्त मिळालीत. आयपीएल, प्रो कबड्डीच्या धर्तीवर देशी खेळांसाठी स्पर्धा भरवून त्या खेळांना लोकप्रियता मिळवून देण्यासाठी सगळे जण प्रयत्न करूया, अशी अपेक्षा अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.