ICC Decade Awards | आयसीसी दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू निवडणार, विराट कोहलीला ‘या’ पाच पुरस्कारांसाठी नामांकन

आयसीसीकडून लवकरच या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे.

ICC Decade Awards | आयसीसी दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू निवडणार, विराट कोहलीला 'या' पाच पुरस्कारांसाठी नामांकन
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 8:29 PM

दुबई : आयसीसीकडून (ICC)आपला सन्मान व्हावा असे प्रत्येक क्रिकेटपटूला वाटतं. आयसीसी लवकरच क्रिकेटपटूंना पुरस्काराने सन्मानित (ICC Decade Awards) करणार आहे. यासाठी आयसीसीने अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) क्रिकेटमध्ये गेल्या दशकात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नामांकन यादी जाहीर केली आहे. आयसीसीने आज ( मंगळवारी 23 नोव्हेंबर) ही नामांकन यादी प्रसिद्ध केली. हे पुरस्कार एकदिवसीय टी 20 आणि कसोटी या क्रिकेटच्या तीनही प्रकारांनुसार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी पुरुषांसोबत महिला क्रिकेटपटूंचाही समावेश असणार आहे. दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) एकूण 5 पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं आहे. icc decade awards virat kohli nominated for five awards

विराटला एकूण 5 पुरस्कारांसाठी नामांकन

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला आयसीसीकडून एकूण 5 पुरस्करांसाठी नामांकन मिळालं आहे. यामध्ये दशकातील सर्वोत्तम कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 खेळाडू या पुरस्करासाठी विराटला नामांकन दिलं आहे. तसेच दशकभरात खेळ भावना जपणाऱ्या आणि सर्वश्रेष्ट पुरुष खेळाडू या पुरस्काराचंही नामांकन मिळालं आहे.

पुरस्काराचे निकष काय?

एका दशकात अर्थात 10 वर्षांमध्ये चमकदार कामगिरीच्या जोरावर खेळाडूंना हा पुरस्कार दिला जाणार आहे. 2010 ते 2019 या कालावधीदरम्यान ज्या ज्या खेळाडूंना दमदार कामगिरी केली आहे, त्या त्या खेळाडूंना नामांकन देण्यात आलं आहे. त्यानंतर आता आयसीसी नामांकन दिलेल्या खेळाडूंमधून सर्वोत्कृष्ट खेळाडूची निवड करेल. निवड केलेल्या खेळाडूला त्या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल.

विराट प्रबळ दावेदार

विराट ICC player of the decade या पुरस्काराचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. विराट गेल्या दशकात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू आहे. तसेच एका दशकात सर्वाधिक शतकी कामगिरी करण्याचा विक्रमही विराटच्याच नावे आहे.

पुरस्कारनिहाय नामांकन मिळालेले खेळाडू

दशकातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रिकेटपटू (Men’s player of the decade): विराट कोहली (टीम इंडिया), रवीचंद्रन अश्विन (टीम इंडिया), जो रूट (इंग्लंड), केन विल्यम्सन (न्यूझीलंड), स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया), एबी डीव्हीलियर्स (दक्षिण अफ्रीका) आणि कुमार संगाकारा (श्रीलंका).

दशकातील सर्वश्रेष्ठ पुरुष कसोटी क्रिकेटपटू (Men’s Test Player of the Decade): विराट कोहली (भारत), केन विल्यम्सन(न्यूझीलंड), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया), जेम्स एंडरसन (इंग्लंड), रंगना हेराथ (श्रीलंका), आणि यासिर शाह (पाकिस्तान).

दशकातील सर्वश्रेष्ठ पुरुष टी 20 क्रिकेटपटू (Men’s T-20 Player of the Decade): विराट कोहली (भारत), रोहित शर्मा(भारत), लसिथ मलिंगा (श्रीलंका), राशिद खान (अफगानिस्तान), इमरान ताहिर (दक्षिण अफ्रिका), अॅरोन फिंच (ऑस्ट्रेलिया) आणि ख्रिस गेल (वेस्ट इंडीज).

खेळ भावना जपणारा दशकातील सर्वश्रेष्ठ खेळाडू (ICC Spirit of Cricket Award of the Year): विराट कोहली (भारत), केन विल्यम्सन (न्यूजीलंड), ब्रँडन मॅक्युलम (न्यूजीलंड), मिसबाह उल हक (पाकिस्तान), महेंद्र सिंह धोनी (भारत), आन्या श्रबसोल (इंग्लंड), कॅथरीन ब्रंट (इंग्लंड), महिला जयवर्धने (श्रीलंका) आणि डॅनियल व्हिटोरी (न्यूजीलंड)

दशकातील सर्वोत्कृष्ट महिला वनडे खेळाडू (Women’s ODI Player of the Decade): मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), अॅलिस पॅरी (ऑस्ट्रेलिया), मिताली राज (भारत), सूजी बेट्स (न्यूझीलंड), स्टेफनी टेलर (वेस्टइंडीज) आणि झुलन गोस्वामी (भारत).

दशकातील सर्वश्रेष्ठ महिला खेळाडू (Women’s Player of the Decade): अॅलिस पॅरी (ऑस्ट्रेलिया), मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), सूजी बेट्स (न्यूझीलंड), स्टॅफनी टेलर (वेस्टइंडीज), मिताली राज (भारत) आणि सारा टेलर (इंग्लंड).

दशकातील सर्वश्रेष्ठ महिला टी-20 खेळाडू (Women’s T-20 Player of the Decade): अॅलिस पॅरी (ऑस्ट्रेलिया), मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), सोफी डिवाइन(न्यूजीलैंड), सूजी बेट्स (न्यूजीलैंड), स्टॅफनी टेलर (वेस्टइंडीज), मिताली राज (भारत) आणि सारा टेलर (इंग्लंड).

संबंधित बातम्या : 

International Cricket Matches | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडिज विरुद्ध न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड ‘या’ एकाच दिवशी आमनेसामने

India Vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीला ‘विराट’ कामगिरी करण्याची संधी

icc decade awards virat kohli nominated for five awards

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.