ICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत ‘विराट’ स्थान अबाधित, रोहित शर्माचा कितवा नंबर?
आयसीसीने वन डे क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. वन डे रँकिंगमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला पहिलं स्थान कायम राखण्यात यश आलं आहे.
ICC Ranking दुबई : आयसीसीने वन डे क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. वन डे रँकिंगमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला पहिलं स्थान कायम राखण्यात यश आलं आहे. तर उपकर्णधार रोहित शर्माही दुसऱ्या स्थानी कायम आहे. या यादीत इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टोने टॉप 10 मध्ये प्रवेश मिळवला आहे. (Virat Kohli First position in ICC ODI ranking)
विराट कोहली 871 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. तर रोहित शर्माच्या खात्यात 855 गुण जमा आहेत. कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट सामने खेळले जात नव्हते. मात्र यानंतरही विराट आणि रोहित पहिल्या दोन क्रमांकावर कायम आहेत.
इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टो कमाल
इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जॉनी बेयरस्टोने 3 स्थानांनी उडी मारली आहे. जॉनी बेयरस्टो 13 व्या स्थानावरुन 10 व्या स्थानावर पोहोचला आहे. बेयरस्टोला ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या वनडे मालिकेमधील कामगिरीचा फायदा झाला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात 112 धावांची शतकी कामगिरी केली.
‘मला विराट कोहलीची विकेट घ्यायचीय’, बांगलादेशची महिला क्रिकेटपटू जहाआरा आलमचं स्वप्न
जॉनी बेयरस्टोने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वनडे सामन्यात अनुक्रमे 84, 0 आणि 112 अशा एकूण 196 धावा केल्या. या कामगिरीमुळे त्याला पुन्हा एकदा टॉप 10 मध्ये प्रवेश मिळाला आहे.
आयसीसी बोलिंग रँकिंग
गोलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेण्ट बोल्ट आणि टीम इंडियाचा मध्यमगती बोलर जसप्रीत बुमराह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने तब्बल 2 वर्षानंतर टॉप 10 मध्ये प्रवेश केला आहे. हेजलवूडला 7 स्थानांचा फायदा झाला आहे. हेजलवूडने 15 व्या क्रमांकावरुन थेट 8 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. हेजलवूड 654 गुणांसह 8 व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
⬆️ Chris Woakes enters top five⬆️ Jofra Archer enters top 10
Major gains for England bowlers in the @MRFWorldwide ICC ODI Player Rankings for Bowling after the #ENGvAUS ODI series ?
Updated rankings ? https://t.co/lRP67a820b pic.twitter.com/Q4FOFgBUkJ
— ICC (@ICC) September 17, 2020
दरम्यान आता 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होत आहे. यावेळेसचा आयपीएलचा 13 वा मोसम आहे. या मोसमातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे.
(Virat Kohli First position in ICC ODI ranking)
संबंधित बातम्या
‘मला विराट कोहलीची विकेट घ्यायचीय’, बांगलादेशची महिला क्रिकेटपटू जहाआरा आलमचं स्वप्न