ICC ODI Rankings: विराट कोहली-रोहित शर्माचा दबदबा कायम, बुमराह तिसऱ्या क्रमांकावर तर जाडेजाची घसरण

आयसीसीने वन डे क्रमवारी (Icc Odi Ranking) जाहीर केली आहे.

ICC ODI Rankings: विराट कोहली-रोहित शर्माचा दबदबा कायम, बुमराह तिसऱ्या क्रमांकावर तर जाडेजाची घसरण
विराट कोहली आणि रोहित शर्मा
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 8:39 PM

दुबई : आयसीसीने वन डे क्रिकेट रँकिग (ICC ODI Rankings) जाहीर केली आहे. वन डे रँकिगमध्ये टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. तर हिटमॅन रोहित शर्माचंही (Rohit Sharma) दुसरं स्थान अबाधित आहे. गोलंदाजांमध्ये यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) तिसरं स्थान कायम राखण्यास यश आले आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जाडेजाची (Ravindra Jadeja) एका क्रमांकाने घसरण झाली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमावारीत बांगलादेशचा शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) पहिल्या क्रमांकावर कायम आहे. (icc odi ranking virat kohli and rohit sharma Remains on top 2)

फलंदाजांच्या यादीत विराटकडे एकूण 870 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर रोहितच्या नावावर 842 पॉइंट्स आहेत. या दोघांशिवाय टीम इंडियाचा एकही फंलदाज टॉप 10 मध्ये नाही. गोलंदाजाच्या क्रमवारीत भारताचा प्रमुख बोलर जसप्रीत बुमराहने तिसरं स्थान कायम ठेवलं आहे. बुमराहकडे एकूण 700 रेटिंग्स पॉईंट्स आहेत. या क्रमवारीत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट पहिल्या क्रमांकावर आहे. बोल्टच्या नावावर एकूण 722 गुण आहेत.

शाकिब अल हसन

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे. शाकिबच्या नावावर 420 रेटिंग्स पॉईंट्स आहेत. आयसीसीने शाकिबवर नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1 वर्ष निलंबनात्मक कारवाई केली होती. यानंतर शाकिबने वेस्टइंडिज विरोधातील तिसऱ्या वनडेमधून पुनरागमन केलं. त्याने या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीसह तो एका संघाकडून 300 विकेट्स आणि 6 हजार (तिन्ही फॉर्मेटमध्ये ) धावा करणारा एकमेव खेळाडू ठरला.

जाडेजाची 8 व्या क्रमांकावर घसरण

या रॅकिंगमध्ये टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाला एका स्थानाचं नुकसान झालं आहे. जाडेजाची आठव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. जाडेजाच्या नावावर एकूण 253 रेटिंग्स पॉईंट्स आहेत.

संबंधित बातम्या :

Shakib Al Hasan | जोरदार एंट्री दमदार रेकॉर्ड, शाकिब अल हसनचा विश्वविक्रम

(icc odi ranking virat kohli and rohit sharma Remains on top 2)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.