IND vs AUS : ऑस्ट्रेलिया सीरीजआधी टीम इंडियासमोर मोठा पेच, हे दोन खेळाडू आमने-सामने, मॅनेजमेंट घेणार अंतिम निर्णय

IND vs AUS : सध्या इंडिया ए ची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. त्यानंतर 22 नोव्हेंबरपासून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये 5 मॅचची टेस्ट सीरीज होणार आहे. मुख्य सीरीजला सुरुवात होण्याआधी टीम इंडियासमोर मोठा पेच आहे. शेवटी परफॉर्मन्सच्या आधारावर टीम मॅनेजमेंटला निर्णय घ्यावा लागेल.

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया सीरीजआधी टीम इंडियासमोर मोठा पेच, हे दोन खेळाडू आमने-सामने, मॅनेजमेंट घेणार अंतिम निर्णय
team india test cricketImage Credit source: Bcci x Account
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 8:57 AM

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 5 मॅचची टेस्ट सीरीज 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. सध्या ‘इंडिया ए’ ऑस्ट्रेलिया टूरवर असून त्यांचे ‘ऑस्ट्रेलिया ए’ विरुद्ध सामने सुरु आहेत. इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए मध्ये दुसरा चार दिवसीय सामना 7 नोव्हेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरु होणार आहे. या सामन्यात भारतीय टीमच्या प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल पहायला मिळू शकतो. केएल राहुल आणि ध्रुव जुरेल दोघांचा इंडिया ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी सुद्धा दोघांची टीममध्ये निवड झाली आहे. दोघांच ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध खेळणं निश्चित आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा पहिला कसोटी सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. रोहितची पत्नी रितिका सजदेहची याच दरम्यान प्रसुती होऊ शकते, अशी मागच्या काही काळापासून चर्चा आहे. त्यामुळे कदाचित रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. टीम इंडिया पर्थ कसोटीत नव्या ओपनिंग जोडीसह उतरु शकते. पण यशस्वी जैस्वाल सोबत या कसोटीत डावाची सुरुवात कोण करणार? हा प्रश्न आहे. इंडिया ए आणि ऑस्ट्रेलियमध्ये ए मध्ये होणाऱ्या सामन्यातून हा निर्णय होऊ शकतो. या एकाजागेसाठी केएल राहुल आणि अभिमन्यु ईश्वरन यांच्यात स्पर्धा आहे.

तोच रोहितची जागा घेईल

ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या पहिल्या चार दिवसीय सामन्यात अभिमन्यु ईश्वरन आणि कॅप्टन ऋतुराज गायकवाडने डावाची सुरुवात केली होती. दुसऱ्या मॅचमध्ये केएल राहुल अभिमन्यु ईश्वरनसोबत ओपनिंगला येऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार राहुल आणि ईश्वरनमध्ये ओपनिंगच्या जागेसाठी थेट सामना आहे. या दोघांपैकी जो चांगलं प्रदर्शन करेल, त्याला पहिल्या टेस्टमध्ये रोहितची जागा मिळू शकते. कॅप्टन ऋतुराज गायकवाड मधल्या फळीत खेळू शकतो. जुरेलला ईशान किशनच्या जागी विकेटकिपिंगची जबाबदारी मिळू शकते.

फर्स्ट क्लासमध्ये त्याच्या नावावर 27 सेंच्युरी

केएल राहुल 2023-24 दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून टेस्टमध्ये मिडल ऑर्डरमध्ये खेळतोय. या दरम्यान त्याने 10 इनिंगमध्ये 37.66 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. राहुलला परदेशात नव्या चेंडूने खेळण्याचा अनुभव आहे. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात टेस्टमध्ये शतक ठोकणाऱ्या दोन आशियाई फलंदाजांपैकी एक आहे. राहुलला पुन्हा एकदा सलामीवीराची संधी मिळू शकते. दुसऱ्याबाजूला अभिमन्यु ईश्वरनने सुद्धा अलीकडे चांगलं प्रदर्शन केलय. फर्स्ट क्लासमध्ये त्याने 27 शतकं झळकावली आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.