India vs Australia 2020 3rd T20 Live Updates : अखेरचा टी-ट्वेन्टी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड, भारताचा 12 रन्सने पराभव

ऑस्ट्रेलियाने प्रथम बँटिंग करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 5 बाद 186 रन्स केले. भारताला जिंकण्यासाठी आता 187 एवढ्या रन्सची आवश्यकता आहे.

India vs Australia 2020 3rd T20 Live Updates : अखेरचा टी-ट्वेन्टी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड, भारताचा 12 रन्सने पराभव
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 7:09 PM

सिडनी :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 2020) यांच्यात आज (मंगळवार) तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 12 रन्सनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारताला जिंकण्यासाठी 187 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. मात्र भारताला हे लक्ष्य पार करण्यात अपयश आलं. भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 07 बाद 174 एवढ्या धावा करता आल्या. तिसरी आणि अखेरची मॅच जिंकत ऑस्ट्रेलियाने या मालिकेचा शेवट गोड केला. विराट कोहलीची झुंजार 85 धावांची खेळी व्यर्थ गेली. भारचाने 3 टी-ट्वेन्टी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली.  (Ind vs Aus 2020 india vs australia 3rd t 20 live score update)

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच बॉलला सलामीवीर के. एल. राहुल शून्यावर तंबूत परतला. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने धावफलक हालता ठेवला. अधूनमधून शिखर-विराट आक्रमक फटके खेळत होते. मात्र असाच आक्रमक फटका खेळण्याच्या नादात शिखर धवनला कॅच आऊट व्हावं लागलं. 21 बॉलमध्ये त्याने 28 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यरला चमकदार कामगिरी करण्यात अपयश आलं.

विराट आणि हार्दिक पांड्याने सोळाव्या आणि सतराव्या ओव्हरमध्ये तीन षटकार आणि दोन चौकार लगावत मॅचची उत्कंठा वाढवली. परंतु चुकीचा फटका खेळत हार्दिक पांड्या आऊट झाला. अ‌ॅडम झम्पाने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर एकट्या विराट कोहलीवर मॅचची जबाबदारी येऊन पडली. तोपर्यंत भारताला जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता होती. मात्र आवश्यक धावगती वाढवण्याच्या नादात विराट कोहली देखील 85 धावांवरआऊट झाला. सरतेशेवटी भारताला 12 रन्सने पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्वेप्सनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ग्लेन मॅक्सवेल, सिन अॅबॉट आणि अँड्र्यू टायने प्रत्येकी एक-एक विकेट घेऊन मिशेलला चांगली साथ दिली.

तत्पूर्वी अखेरच्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतल्याने ऑस्ट्रेलियाला प्रथम बँटिंग करावी लागली. ऑस्ट्रेलियाने प्रथम बँटिंग करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 5 बाद 186 रन्स केले. भारताला जिंकण्यासाठी 187 एवढ्या रन्सची होती.

ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेलने जोरदार फटकेबाजी केली. वेड आणि मॅक्सवेलच्या फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 186 धावा केल्या. वेडने सुरुवातीलाच आक्रमक रुप धारण करत भारतीय बोलर्सला टार्गेट केलं. त्याने 53 बॉलमध्ये 80 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर मॅक्सवेलने देखील चांगली खेळी केली. 36 बॉल्समध्ये त्याने 54 रन्स केले. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. याशिवाय स्टीव्ह स्मिथने 24 रन्स केल्या. पहिल्या 15 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चांगल्या धावा केल्या होत्या. मात्र ती धावगती राखण्यात अखेरच्या 5 ओव्हरमध्ये त्यांना अपयश आलं.

भारताकडून वॉश्गिंटन सुंदरने 4 ओव्हरमध्ये 34 रन्स देऊन 2 विकेट्स मिळवल्या. टी नटराजनने आणि शार्दूल ठाकूरने प्रत्येकी 1-1 विकेट्स मिळवली. या मॅचमध्ये युजवेंद्र चहलला एकही विकेट मिळाली नाही. तो भारतातर्फे महागडा बोलर्स ठरला. त्याने 4 ओव्हरमध्ये 41 रन्स ऑस्ट्रेलियाला बहाल केले.

पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने धूळ चारत मालिका  2-0 ने खिशात घातली. त्यामुळे तिसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरण्याअगोदर भारताचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल. याउलट पहिले दोन्ही सामने गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास डळमळीत असेल. शेवटच्या सामन्यात चांगली कामगिरी करुन सामना जिंकण्याचं आव्हान ऑस्ट्रेलिया संघासमोर असेल.

दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय

दुसऱ्या टी-ट्वे्न्टी सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने टी 20 मालिकाही जिंकली. टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 2 चेंडूआधी पूर्ण केलं. टीम इंडियाकडून शिखर धवनने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्याने 22 चेंडूत नाबाद 42 धावांची निर्णायक खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीनेही 40 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल सॅम्स, अँड्रयू टाय, मिचेल स्वीपसन आणि अॅडम झॅम्पा या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 11 रन्सनी विजय

पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात टी नटराजन आणि युजवेंद्र चहलच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने बाजी मारली होती. या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव केला होता. भारतानं दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सात बाद 150 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. भारताकडून नटराजननं 30 धावात 3 विकेट्स घेतल्या होत्या.

टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू समॅसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी नटराजन आणि शार्दुल ठाकुर.

ऑस्ट्रेलिया: एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एलेक्स कॅरी, जोश हेजलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सैम्स, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, डार्सी शॉर्ट, अॅडम झॅम्पा, मिशेल स्वेपसन आणि नॅथन लायन.

संबंधित बातम्या :

India vs Australia 1st T20 Update : टीम इंडियाची विजयी सलामी,ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय 

India vs Australia 2020 2nd T20 Updates : हार्दिकची फटकेबाजी, धवनचे अर्धशतक, अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने मात, सीरिजही जिंकली

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.