AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs Aus | पहिल्या कसोटीत ऐतिहासिक पराभव, दुसऱ्या सामन्यासाठी संघ व्यवस्थापनाकडून ह्या मोठ्या बदलांची शक्यता

पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये काही बदल करण्याची तयारी भारतीय संघ व्यवस्थापननाने केली आहे. 

Ind Vs Aus | पहिल्या कसोटीत ऐतिहासिक पराभव, दुसऱ्या सामन्यासाठी संघ व्यवस्थापनाकडून ह्या मोठ्या बदलांची शक्यता
| Updated on: Dec 21, 2020 | 8:59 AM
Share

मेलबर्नटीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव (Australia vs India 1st Test) स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात ढिसाळ कामगिरीचा फटका बसला. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये काही बदल करण्याची तयारी भारतीय संघ व्यवस्थापननाने केली आहे. (Ind vs Aus 2nd test match Big Changes team India)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये एकूण 4 बदल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विराटऐवजी राहुलला संधी?

कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा गर्भवती आहे. लवकरच अनुष्का-विराट आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे पहिल्या सामन्यानंतर विराट मायदेशी परतणार आहे. याच कारणामुळे विराटच्या जागी केएल राहुलला संधी मिळू शकते.

शमीच्या जागी मोहम्मद सिराज?

दुसऱ्या डावात बॅटिंगदरम्यान मोहम्मद शमीच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे शमी मालिकेतून बाहेर झाला आहे. यामुळे संघात शमीच्या जागेवर मोहम्मद सिराजला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

पृथ्वी शॉ ऐवजी शुभमन गिल

पृथ्वी शॉ आयपीएलच्या 13 व्या मोसमापासून ढिसाळ कामगिरी करतोय. तरीही त्याची कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली. त्याला पहिल्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. मात्र पृथ्वीने पुन्हा टीम मॅनेजमेंटचा विश्वास खोटा ठरवला. पृथ्वीने पहिल्या डावात शून्य तर दुसऱ्या डावात अवघ्या 4 धावा केल्या. यामुळे पृथ्वीच्या जागी दुसऱ्या सामन्यासाठी युवा शुभमन गिलला सलामीवीर म्हणून संधी मिळण्याची तीव्र शक्यता आहे. जर शुभमनला संधी मिळाली, तर त्याचं हे कसोटी पदार्पण ठरेल.

पंतला सराव सामन्याचं बक्षिस

पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि विराटचा अपवाद वगळता इतर कोणत्याही बॅट्समनला चांगली खेळी करता आली नाही. कांगारुंनी भारतीय फलंदाजांना मैदानात सेट होण्याची वेळ दिली नाही. कसोटी मालिकेआधी ‘ऑस्ट्रेलिया अ’ विरोधात 2 सराव सामने खेळण्यात आले. या दुसऱ्या सामन्यात पंतने शानदार शतकी खेळी केली. त्यामुळे पंतला विकेटकीपर रिद्धीमान साहाच्या जागी संधी मिळू शकते. तसेच ऑलराऊंडर म्हणून रवींद्र जाडेजाला हनुमा विहारीच्या जागी संधी दिली जाऊ शकते. दरम्यान जाडेजाच्या प्रकृतीबाबत टीम मॅनेजमेंटकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

विराट पहिल्या सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. यामुळे टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटीत चांगलाच कस लागणार आहे. दुसरा कसोटी सामना हा बॉक्सिंग डे सामना असणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे.

(Ind vs Aus 2nd test match Big Changes team India)

संबंधित बातम्या

Australia vs India, 1st Test | कसोटी इतिहासात टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

Australia vs India 1st Test | टीम इंडियाच्या पराभवाचे टॉप 3 व्हिलन

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.