Ind vs Aus : आर. आश्विनचे रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये आश्विनने आणखी एक विक्रम आपल्या नावावर करत शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये आर. आश्विन आणि जडेजाच्या फिरकीपुढे कांगारूंनी आजही लोटांगण घातलं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा संघाचा पहिला डाव 263 धावांवर आटोपला. मोहम्मद शमी, आर. आश्विन आणि रविंद्र जडेजा या त्रिकुटासमोर कांगारूंनी शरणागती पत्करली. शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर आश्विन आणि जडेजाने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. या प्रदर्शनाच्या जोरावर आश्विनने आणखी एक विक्रम आपल्या नावावर करत शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
आश्विनने भारताचा माजी दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे याची बरोबरी साधली आहे. आजच्या सामन्यात 3 विकेट्सच्या जोरावर एक शतक पूर्ण केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध 100 विकेट्स घेणारा आश्विन दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 111 बळी घेतले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी अनिल कुंबळे 111, दुसऱ्या स्थानी आर. आश्विन 100 आणि तिसऱ्या क्रमांकावर हरभजन सिंह 95 आहे. आश्विनने नागपूर कसोटीमध्ये 8 विकेट्स घेतल्या होत्या. आज दुसऱ्या कसोटीमध्ये तीन विकेट्स घेत हा पराक्रम आपल्या नावावर केला आहे.
भारताकडून कसोटीमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीमध्ये आश्विन 460 विकेट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्याा स्थानी 434 विकेट्ससह कपिल देव आहेत. चौथ्या क्रमांकावर हरभजन सिंह 417 विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या स्थानी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि झहीर खान 311 आहेत.
दरम्यान, रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत 90 कसोटी सामन्यांच्या 169 डावांमध्ये 460 विकेट्स घेतल्या आहेत. 113 एकदिवसीय सामन्यांमध्ये 151 तर 65 टी-20मध्ये 72 विकेट्स आणि आयपीएलच्या 184 सामन्यांमध्ये 157 विकेट्स घेतल्या आहेत.
चेतेश्वर पुजारा याचा 100 वा सामना
टीम इंडियाचा ‘द वॉल 2’ चेतेश्वर पुजारा याच्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा हा दुसरा कसोटी सामना अत्यंत खास आहे. पुजारा याच्या कसोटी कारकीर्दीतील हा 100 वा सामना आहे. या 100 व्या सामन्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली. तेव्हा टीम इंडियाच्या खेळाडूंनी चेतेश्वर पुजारा याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,
टीम ऑस्ट्रेलिया – पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.