KL Rahul : दोन्ही डोळे बंद, हात कानाला, के एल राहुलच्या शतकी सेलिब्रेशनचा अर्थ काय? ‘राज की बात’ त्याच्याकडून…

विराटचा विश्वास सार्थ ठरवत पुण्यात पहिल्या एकदिवसीय सामन्यात राहुलचा फॉर्म परत आला. पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. तर शुक्रवारच्या दुसऱ्या सामन्यात त्याने आक्रमक पद्धतीने शतक झळकावून टीकाकारांची तोंडं बंद केली. Ind vs Eng KL Rahul

KL Rahul : दोन्ही डोळे बंद, हात कानाला, के एल राहुलच्या शतकी सेलिब्रेशनचा अर्थ काय? 'राज की बात' त्याच्याकडून...
KL Rahul unique Celebration After Century
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 11:24 AM

पुणे : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आक्रमक बॅट्समन के.एल.राहुलची (K L Rahul) बॅट चांगलीच बोलली. त्याच्या बॅटने टीकाकारांची तोंडं बंद केली. साहेबांच्या गोलंदाजीचा राहुलने यथेच्छ समाचार घेतला. राहुलने 114 चेंडूत 108 धावांची खेळी करताना 7 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार लगावले. यादरम्यान शानदार शतक झळकावल्यानंतर राहुलने सेलिब्रेशनही खास अंदाजात केलं. याच खास सेलिब्रेशन पाठीमागचं गुपीत के.एल. राहुलने सामन्यानंतर सांगितलं. (Ind vs Eng KL Rahul reveal unique Celebration After Century)

के.एल. राहुलचं अनोखं सेलिब्रेशन

दुसऱ्या वन डे सामन्यात के.एल. राहुलने शानदार शतक झळकावलं. शतकानंतर त्याने खास सेलिब्रेशन केलं. पहिल्यांदा दोन्ही डाळे झाकले आणि त्यानंतर दोन्ही हातांची बोटे कानाजवळ नेली. एकंदरिच त्याच्या या कृतीतून त्याला काहीतरी संदेश द्यायचा आहे, हे भारतीय क्रिकेट फॅन्सला कळालं नाही. पण सामना संपल्यानंतर के.एल. राहुलने त्याची कृती समजावून सांगितली.

के. एल राहुलने सांगितली ‘राज की बात’

“माझं सेलिब्रेशन हे बाहेर उठलेल्या आवाजाला शांत करण्यासाठी होतं. याचा अर्थ असा नाही की मला त्यांना अपमानित करायचं होतं. काही लोक तुम्हाला अनेकदा पाण्यात बघत असतात. बहुदा त्यांच्यावर लक्ष देण्याची गरज नसते. यासाठीच बाहेरच्या आवाजाला शांत करण्यासाठी माझं सेलिब्रेशन होतं,” अशी राज की बात के.एल. राहुलने सांगितली.

के.एल. राहुलने असं सेलिब्रेशन का केलं?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी ट्वेन्टी मालिका पार पडली. परंतु या मालिकेत राहुलची बॅट बोलली नाही. तो जर चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला संघात का ठेवलंय, असा सवाल अनेक क्रिकेटपटूंनी केला. हाच सवाल क्रिकेट फॅन्सही विचारत होते. अगदी याचवरुन वीरेंद्र सेहवागने कर्णधार विराटवर टीकाही केली. पण विराट राहुलच्या साथीला खंबीरपणे उभा राहिला. तो एक मॅचविनर खेळाडू आहे. जेव्हा त्याचा परफॉर्मन्स होत नसतो तेव्हा अशा खेळाडूपाठीमागे उभं राहायला हवं, असं सांगत विराट राहुलला संधी देत राहिला.

विराटचा विश्वास सार्थ ठरवत पुण्यात पहिल्या एकदिवसीय सामन्यात राहुलचा फॉर्म परत आला. पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. तर शुक्रवारच्या दुसऱ्या सामन्यात त्याने आक्रमक पद्धतीने शतक झळकावून टीकाकारांची तोंडं बंद केली. त्याचमुळे त्याने अशा प्रकारचं सेलिब्रेशन केलं.

(Ind vs Eng KL Rahul reveal unique Celebration After Century)

हे ही वाचा :

Ind Vs Eng : सापांनी भरलेल्या जंगलातून वाट तुडवतो, दोन किमी डोंगरावरुन मॅच पाहतो, टीम इंडियाचा वेडा फॅन!

Video : सॅम करनने भडकवलं, हार्दिक करनच्या मागे पळाला, अंपायर्सने थांबवलं, पाहा मैदानात काय काय घडलं…?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.