टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचं शुभमंगल सावधान!

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणार्‍या विजय शंकरने 2018 मध्ये कोलंबो येथे श्रीलंकाविरुद्धच्या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचं शुभमंगल सावधान!
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 4:50 PM

हैदराबाद : भारतीय क्रिकेट संघातील अष्ठपैलू खेळाडू विजय शंकर विवाह बंधनात अडकला आहे. विजयने त्याची मैत्रीण वैशाली विश्वेश्वरन हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. 2020 आयपीएलचा हंगाम सुरु होण्यापूर्वी दोघांचा साखरपुडा झाला होता, आता विजय आणि वैशाली विवाह बंधनात अडकले आहेत. विजय आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो. सनरयझर्स हैदराबाद संघाने सोशल मीडियावर एक पोस्ट करुन विजय-वैशालीच्या लग्नाची माहिती दिली आहे, तसेच या नवदाम्पत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत. (India cricketer Vijay Shankar gets married)

दरम्यान, विजय शंकरच्या आयुष्यातील या नव्या सुरुवातीसाठी भारतीय संघातील तसेच सनरायझर्स हैदराबाद या संघातील अनेक खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. के.एल. राहुल, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, क्रुणाल पंड्या, मोहम्मद सिराज यांनी विजयला शुभेच्छा दिल्या आहेत.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणार्‍या विजय शंकरने 2018 मध्ये कोलंबो येथे श्रीलंकाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे पहिला एकदिवसीय सामना खेळत त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. इंग्लंडमध्ये आयोजित 2019 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याची टीम इंडियाच्या (Team India) संघात निवड झाली होती.

विजय शंकरने आतापर्यंत 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. या 12 सामन्यांमध्ये त्याने 223 धावा जमवल्या आहेत. 46 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर 9 टी-20 सामन्यांमध्ये विजयने 101 धावा जमवल्या आहेत. 43 ही त्याची सर्वोच्च टी-20 धावसंख्या आहे. गोलंदाजीत त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 4 तर टी-20 मध्ये 5 बळी मिळवले आहेत.

आयपीएलच्या आगामी आवृत्तीसाठी हैदराबाद फ्रँचायझीने 30 वर्षीय विजयला रिटेन केले असून पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, केन विलियम्सन, जॉनी बेयरस्टो, रिद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, प्रियम गर्ग, विराट सिंह, रशिद खान, विजय शंकर, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, मिशेल मार्श, जेसन होल्डर, अब्दुल समद, टी. नटराजन, खलील अहमद, संदीप शर्मा, तुलसी थंपी, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार या खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे. तर बिली स्टॅनलेक, फेबियन एलन, संजय यादव, बी. संदीप, वाय. पृथ्वीराज या खेळाडूंना संघमुक्त केलं आहे.

हेही वाचा

IPL Teams Ratained and Released Players : पंजाबकडून मॅक्सवेलला डच्चू, बंगळुरुकडून फिंचची उचलबांगडी, सर्व संघाच्या खेळाडूंची संपूर्ण यादी

 मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्याबाबत मोठा निर्णय

अजिंक्य रहाणे-आर्याचा भन्नाट डान्स, चेन्नईतील हॉटेलमध्ये बापलेकीचा फनटाईम

(India cricketer Vijay Shankar gets married)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.