2011 नंतर विश्वचषकात भारताचा फक्त दोन वेळा पराभव
विश्वचषक सामन्यात भारताने सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात करुन भारताने आपला विजयरथ कायम राखला. या सामन्यात मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
लंडन : विश्वचषक सामन्यात भारताने सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात करुन भारताने आपला विजयरथ कायम राखला. या सामन्यात मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं. मात्र अफगाणिस्ताननेही भारताला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करायला लावला. हा विजय भारतासाठी खास ठरला आहे. कारण काल (23 जून) झालेल्या सामन्यात भारताने विश्वचषकातील 50 वा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे 2011 नंतर विश्वचषक सामन्यात भारताचा फक्त दोनवेळा पराभव झाला आहे.
भारताने विश्वचषक सामन्यात 50 वा विजय मिळवल्यानंतर चाहत्यांकडूनही खेळाडूंचे कौतुक करण्यात येत आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड भारतापेक्षा पुढे आहेत. या दोन्ही देशांनीही विश्वचषक सामन्यात आतापर्यंत 50 पेक्षा अधिक वेळा विजय मिळवला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 67 आणि न्यूजीलंडने 52 सामन्यात विजय मिळवला आहे.
आतापर्यंत विश्वचषकात झालेल्या सामन्यात भारताने फक्त दोन सामन्यात पराभव पत्कारला होता. यामध्ये 2011 ला साऊथ आफ्रिका आणि 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारत विरुद्ध अफगाणिस्थानमध्ये झालेल्या थरारक सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमरा, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन, तर मोहम्मद शमीने चार फलंदाजांना माघारी धाडत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि हॅट्ट्रिकही केली. गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताला अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवणे सोपं झाले.
संबधित बातम्या :
भारत हा जगातला सर्वोकृष्ट संघ, अफगाणिस्तानच्या कर्णधाराकडून कौतुक