INDIA TOUR AUSTRALIA | विराट कोहली सर्वश्रेष्ठ खेळाडू, ऑस्ट्रेलिया हेड कोच जस्टिन लॅंगरकडून कौतुक

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

INDIA TOUR AUSTRALIA | विराट कोहली सर्वश्रेष्ठ खेळाडू, ऑस्ट्रेलिया हेड कोच जस्टिन लॅंगरकडून कौतुक
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 9:36 PM

मेलबर्न | टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Team India Tour Australia) यूएईहून रवाना झाली. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) या तीनही मालिकेत भारताचे नेतृत्व करणार आहे. मात्र विराट पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. विराट बाबा होणार असल्याने तो माघारी येणार आहे. “विराट हा सर्वश्रेष्ट खेळाडू आहे. विराटने पालक्त्वासाठी रजा घेतली आहे. या निर्णयाचं मी स्वागत करतो”, या शब्दात ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगरने ( Australian Coach Justin Langer) विराटचं कौतुक केलं आहे. तसेच  india tour australia indian captain virat kohli best player compliment from australian coach justin langer

लॅंगर काय म्हणाला?

“विराट पहिल्या सामन्यानंतर उर्वरित 3 कसोटी सामन्यांसाठी तो भारतासाठी उपस्थित नसेल. याचा मोठा परिणाम टीम इंडियावर पडेल. बीसीसीआयने विराटला पाल्कत्वाची रजा मंजूर केली आहे. जानेवारी महिन्यात विराटच्या घरी पाहुण्याचं आगमन होणार आहे. या अशा आयुष्यातील मोठ्या क्षणी तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छितो. विराट आपल्या कुटुंबाला प्राथमिकता देतो. यासाठी मी त्याचा सन्मान करतो”, असं लॅंगर म्हणाला. लँगरने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळेस तो बोलत होता.

“मी माझ्या क्रिकेट जीवनात अनेक उत्तम खेळाडू पाहिले. त्यापैकी विराट हा सर्वश्रेष्ट आहे. यामागे काही कारणं पण आहेत. तो उत्तम फलंदाज आहे म्हणून मी त्याचं कौतुक करत नाही. तर विराटमध्ये खेळाप्रती असलेला आदरभाव, त्याप्रती असलेलं समर्पण, उर्जा आणि त्याची फिल्डिंग हे जबाबदार आहे”, असं लॅंगर म्हणाला. “विराट जे काही करतो, त्यामध्ये 100 टक्के देतो. त्याच्या मायदेशी परतण्याचा निर्णयाचा मी सन्मान करतो. विराट तुमच्या आमच्या सारखा माणूसचं आहे. आपल्या पहिल्या पाल्याच्या जन्मवेळेस हजर रहा. हाच सल्ला मी कोणत्याही खेळाडू देईन, असंही लँगर म्हणाला

“कसोटी मालिकेवर प्रभाव पडणार”

“कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियावर निश्चितच परिणाम होईल. टीम इंडियाने 2018-19 मध्ये आम्हाला कसोटी मालिकेत पराभूत केलं होतं. टीम इंडियाची टीम मजबूत आहे. विराट असो वा नसो मात्र आम्हाला एका सेकंदासाठीही आत्मसंतुष्ट होता कामा नये”, असंही लॅंगरने स्पष्ट केलं.

दरम्यान ऑस्ट्रेलियाने 12 नोव्हेंबरला टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा केली आहे. यामध्ये 5 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

आस्ट्रेलिया टेस्ट टीम : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), सीन एबोट, जो बर्न्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लियोन, मायकल नासिर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वार्नर .

भारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा

India Tour of Australia | कसोटी मालिकेदरम्यान या कारणामुळे कर्णधार कोहली मायदेशी परतणार

India Tour Australia | ठरलं! अखेर हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, पण….

india tour australia indian captain virat kohli best player compliment from australian coach justin langer

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.