India vs Australia 2020, 2nd Odi | ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यात कोहलीचा ‘विराट’ कारनामा

विराटची ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफलातून कामगिरी

India vs Australia 2020, 2nd Odi | ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यात कोहलीचा 'विराट' कारनामा
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 9:03 PM

सिडनी : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 51 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियाने या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने 89 धावांची झुंजार खेळी केली. विराटने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यात अनेक रेकॉर्ड केले. india vs australia 2020 2nd Odi virat kohli completed 22 thousand international runs, 250 odi matches, and 2 thousand runs against australia

एकदिवसीय कारकिर्दीतील 250 वा सामना

विराटने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यात टॉसला येताच पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाविरोधातील हा दुसरा सामना विराटच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 250 वा सामना ठरला. टीम इंडियाकडून 250 सामने खेळणारा विराट नववा खेळाडू ठरला. याआधी टीम इंडियाकडून सचिन तेंडुलकर, अजहर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, युवराज सिंह, वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंह धोनी या खेळाडूंनी टीम इंडियाकडून 250 पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 22 हजार धावा

विराटने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यात आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 22 हजार धावा पूर्ण केल्या. विराट अशी कामगिरी करणारा एकूण आठवा तर टीम इंडियाचा तिसरा खेळाडू ठरला. टीम इंडियाकडून सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दोन्ही खेळाडूंनीच 22 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. विराटने एकूण 418 आंतरराष्ट्रीय सामन्यातील (एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी) 462 डावांमध्ये 56.15 च्या सरासरीने 22 हजार 11 धावा केल्या आहेत. यामध्ये विराटने एकूण 70 शतकं तर 105 अर्धशतकं लगावली आहेत.

ऑस्ट्रेविरोधातील 2 हजार धावा

विराटने सामन्यातील 28 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. या चौकारासह विराटने ऑस्ट्रेलियाविरोधात एकदिवसीय सामन्यात 2 हजार धावा पूर्ण केल्या. विराटने 40 डावात या 2 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला. याआधी टीम इंडियाकडून सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा या फलंदाजांनी 2 हजार केल्या आहेत.

तिसरा सामना बुधवारी

दरम्यान ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा आणि अखेरचा सामना बुधवारी 2 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | विराट कोहली वन डेमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचकडून कौतुक

India vs Australia 2020 | विराट कोहलीने रचला इतिहास, हा रेकॉर्ड करणारा 9 वा भारतीय खेळाडू

India vs Australia 2020, 2nd Odi | जिंकलास भावा ! ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यादरम्यान भारतीय पठ्ठ्याकडून ऑस्ट्रेलियन तरुणीला प्रपोज

india vs australia 2020 2nd Odi virat kohli completed 22 thousand international runs, 250 odi matches, and 2 thousand runs against australia

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.