India vs Australia 2020 | आयपीएलमध्ये फ्लॉप, टीम इंडियाविरुद्ध हिट, ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूने केएल राहुलची मागितली माफी
या खेळाडूने भारताविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार खेळी केली.
सिडनी : पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव (India Tour Australia 2020) केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. कर्णधार अॅरॉन फिंचने114 तर स्टीव्ह स्मिथने 105 धावांची शतकी खेळी केली. तर अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने ( Australia All Rounder Glenn Maxwell) या सामन्यात लक्षवेधी खेळी केली. मॅक्सवेलने 19 चेंडूत 5 फोर आणि 3 सिक्ससह 45 धावांची तडाखेदार खेळी केली. दरम्यान या खेळीनंतर मॅक्सवेलने टीम इंडियाचा उपकर्णधार आणि आयपीएलमधील (IPL 2020) पंजाब संघाचा (Kings Eleven Punjab) कर्णधार केएल राहुलची (K L Rahul) माफी मागितली. india vs australia 2020 australian all rounder glenn maxwell apologizes to k l rahul
माफी का मागितली ?
मॅक्सवेलने भारताविरोधातील पहिल्या सामन्यात धमाकेदार खेळी केली. मात्र हाच मॅक्सवेल आयपीएलमध्ये सपशेल अपयशी ठरला. त्याला आयपीएलच्या 13 व्या मोसमात एकही अर्धशतक लगावता आलं नाही. मॅक्सवेलला लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही. मॅक्सवेल आयपीएलमध्ये पंजाबचं प्रतिनिधित्व करतो. तर केएल राहुल या संघाचा कर्णधार आहे. मॅक्सवेलने केलेली तडाखेदार फलंदाजी भारतीय क्रिकेट समर्थकांना पचनी पडली नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी मॅक्सवेलला चांगलंच ट्रोल केलं.
Hahaha that’s actually pretty good @Gmaxi_32 ? https://t.co/vsDrPUx58M
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) November 28, 2020
यानंतर न्यूझीलंडचा खेळाडू आणि पंजाबकडून खेळणारा जेम्स निशामने ट्विटरवर केएल राहुलचा रागावलेला मीम शेअर केला. निशामने हा मिम “हा हा, हे लय भारी आहे”, अशी कॅप्शन देत शेअर केला. तसेच या ट्विटमध्ये मॅक्सवेलला मेन्शन (उल्लेख) केलं. ‘मी बॅटिंग करताना केएलची माफी मागितली होती’, अशी विनोदी प्रतिक्रिया मॅक्सवेलने या ट्विटवर दिली.
I apologised to him while I was batting ? ? ? #kxipfriends ❤️
— Glenn Maxwell (@Gmaxi_32) November 28, 2020
मॅक्सवेलची आयपीएलच्या 13 व्या पर्वातील कामगिरी
मॅक्सवेल आयपीएलच्या 13 व्या मोसमातील एकूण 13 सामने खेळला. या 13 सामन्यात त्याने 15. 42 च्या सामन्य सरासरीने 108 धावा केल्या. 32 ही त्याची या मोसमातील सर्वोच्च धावासंख्या ठरली.
टीम इंडियासाठी ‘करो या मरो’
3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाची या मालिकेत 0-1 अशी पिछाडी झाली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी करो या मरोची स्थिती आहे. टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना रविवार 29 नोव्हेंबरला सिडनीत खेळण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020, KXIP vs DC | किंमत 10.75 कोटी, 10 सामन्यात केवळ 90 धावा, तरीही कर्णधाराकडून कौतुक
India vs Australia 2020 | कांगारुनी धू धू धुतला, फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या नावे नकोसा विक्रम
india vs australia 2020 australian all rounder glenn maxwell apologizes to k l rahul