India vs Australia 2020 | कोहलीची कॅप्टन्सी समजणे अवघड, गंभीरचा विराटवर हल्लाबोल

टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने पुन्हा एकदा विराट कोहलीला टार्गेट केलं आहे.

India vs Australia 2020 | कोहलीची कॅप्टन्सी समजणे अवघड, गंभीरचा विराटवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 2:23 PM

मुंबई : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 51 धावांनी पराभव (India Tour Australia 2020) केला. या पराभवासह टीम इंडियाने एकदिवसीय मालिकाही गमावली. टीम इंडियाचा माजी फंलदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पुन्हा एकदा कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli)जोरदार हल्ला चढवला आहे. विराटची कॅप्टन्सीही आकलनाबाहेरची आहे, असा घणाघातच गंभीरने केली आहे. india vs australia 2020 Former india batsman gautam gambhir criticizes virat kohli for leadership

ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी टीम इंडियाविरोधात सलग दुसऱ्या सामन्यात 150 धावांची सलामी भागीदारी केली. टीम इंडियाचे गोलंदाज विकेट घेण्यास अपयशी ठरले. दोन्ही सामन्यांमध्ये सलामीच्या मोठ्या भागीदारीनंतर टीम इंडियाला विकेट मिळाली. या दरम्यान कर्णधार विराटने गोलंदाजीत अनेक बदल केले. या बदलांवरुन गंभीरने विराटवर टीका केली आहे.

गंभीर काय म्हणाला?

जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा महत्वाचा गोलंदाज आहे. विराटने बुमराहला सामन्याच्या सुरुवातीला फक्त 2 ओव्हर गोलंदाजी करण्यास दिली. यानंतर विराटने इतर दुसऱ्या गोलंजदाजांना संधी दिली. यावरुन गंभीरने आक्षेप नोंदवला. “सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्यासाठी विकेट घेणं महत्त्वाचं असतं. तरीही यानंतर विराट 2 ओव्हरनंतर आपल्या प्रमुख गोलंदाजाला बाजूला करतो. मला विराटची कॅप्टन्सी समजत नाहीये” असं गंभीर म्हणाला. गंभीर दुसऱ्या सामन्यानंतर इसपीएल-क्रिकइंफोसोबत बोलत होता.

“टी 20 क्रिकेट नाही”

“वनडे क्रिकेटमध्ये सामन्याच्या सुरुवातीला आपल्या प्रमुख गोलंदाजांकडून कमाल 4 किंवा किमान 3 ओव्हर गोलंदाजी करुन घेतली जाते. पण विराटने आपल्या मुख्य गोलंदाजाला सुरुवातीला केवळ 2 ओव्हरनंतर बदललं. असं करायला हे काही टी 20 क्रिकेट नाही”, असंही गंभीरने नमूद केलं.

सहावा गोलंदाज

टीम इंडियाला गेल्या 2 सामन्यात सहाव्या गोलंदाजांची उणीव भासतेय. टीम इंडिया या दोन्ही सामन्यात 5 गोलंदाजांसह मैदानात उतरली. यावरुनही गंभीरने लंक्ष वेधलं. “आपल्याकडे वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यासारखे गोलंदाज आहेत. या गोलंदाजांना संधी द्यायला हवी होती. मिळालेल्या संधीचा हे गोलंदाज कसा उपयोग करतात हे पाहाता आलं असतं. पण जर टीम इंडियाकडे सहाव्या गोलंदाजासाठी प्रबळ दावेदार नाहीये, तर ही निवड समितीची मोठी घोडचूक आहे”, असंही गंभीरने म्हटलं.

तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला

या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्न असणार आहे. या एकदिवसीय मालिकेनंतर 3 टी 20 सामन्यांची आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | कर्णधार विराटकडून टीम इंडियाच्या पराभवाचं खापर गोलंदाजांच्या माथी

India vs Australia 2020 | वॉर्नर संघाबाहेर राहिला तर टीम इंडियासाठी फायदेशीरच, ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या दुखापतीवर केएलची प्रतिक्रिया

IND vs AUS: कांगारुंना दुहेरी झटका, दोन दिग्गज खेळाडू एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतून बाहेर

india vs australia 2020 Former india batsman gautam gambhir criticizes virat kohli for leadership

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.