India vs Australia 2020 | रेट्रो जर्सीमधील ‘गब्बर’ शिखर धवनचा किलर लूक

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत या नव्या जर्सीसह खेळताना दिसणार आहे.

India vs Australia 2020 | रेट्रो जर्सीमधील 'गब्बर' शिखर धवनचा किलर लूक
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 6:27 PM

सिडनी : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला (India Tour Australia 2020) काही अवघे तास शिल्लक आहेत. टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होत आहे. 27 नोव्हेंबरला पहिला एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया रेट्रो जर्सीमध्ये (New Retro Jercy) खेळताना दिसणार आहे. टीम इंडियाचा ‘गब्बर’ शिखर धवनने (Shikhar Dhawan) या रेट्रो जर्सीमधील सेल्फी फोटो फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केला आहे. नवीन जर्सी, पुढे जाण्यासाठी सज्ज आहोत, असं कॅप्शन शिखरने या फोटोला दिलं आहे. या नव्या जर्सीचा रंग गडद निळा (नेवी ब्ल्यू) आहे. 70 च्या दशकात टीम इंडियाचे खेळाडू यासारखीच जर्सी परिधान करायचे. india vs australia 2020 gabbar shikhar dhawan has share photo with new retro jersy

ऑस्ट्रेलियाही नव्या जर्सीत मैदानात उतरणार

ऑस्ट्रेलियाचा संघही टीम इंडियाविरुद्ध नव्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने 11 नोव्हेंबरला या जर्सीचं अनावरण केलं होतं. ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांचं देशाच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. या योगदानासाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी विशेष जर्सीचं डिझाईन करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया टीम इंडियाविरुद्धच्या टी 20 मालिकेत ही स्पेशल जर्सी परिधान करणार आहे.

“या जर्सीची डिझाईन अ‍ॅसिक्स, टी फिओना क्लार्क आणि कोर्टनी हॉगेन यांनी केलं आहे. टी फिओना क्लार्क या दिवंगत क्रिकेटपटू मस्किटो कुसेन्स यांच्या वशंज आहेत. ही जर्सी मूळ, विद्यमान आणि भविष्यातील स्वदेशी खेळाडूंना समर्पित आहे”, अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने दिली. “ही जर्सी घालून खेळण्यासाठी मी उत्साहित आहे”, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलिचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्केने दिली होती. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अशी जर्सी परिधान केली होती.

एकदिवसीय आणि टी 20 मालिकेचे वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

संबंधित बातम्या :

Team India | टीम इंडियाला मिळाला नवा किट स्पॉन्सर, बीसीसीआयची घोषणा

India Tour Australia | टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया नव्या जर्सीसह मैदानात

Photo | India Tour Australia, टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध नव्या जर्सीत

india vs australia 2020 gabbar shikhar dhawan has share photo with new retro jersy

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.