India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरोधातील टी 20 मालिकेत अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनला हरभजनचा मोलाचा सल्ला

संजूने ऑस्ट्रेलियाविरोधातील टी 20 मालिकेत केवळ 48 धावा केल्या.

India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरोधातील टी 20 मालिकेत अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनला हरभजनचा मोलाचा सल्ला
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 3:54 PM

सिडनी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर टी 20 मालिकेत 2-1 च्या फरकाने विजय मिळवला. या टी 20 मालिकेत टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. तर काही खेळाडू अपयशी ठरले. संजू सॅमसन (Sanju Samson) या टी 20 मालिकेत अपयशी ठरला. या मालिकेत त्याची बॅट एकदाही तळपली नाही. त्याला बॅटिंगने विशेष काही करता आले नाही. आयपीएलमध्ये (IPL 2020) फटकेबाजी करणाऱ्या संजूने ऑस्ट्रेलियाविरोधात केवळ 48 धावाच केल्या. अशा कामगिरीमुळे संजूला पुन्हा संधी मिळणार नाही, अशीच चिन्ह दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंहला (Harbhajan Singh) संजूवर विश्वास आहे. मला संजूच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे. संजू टीम इंडियाचा भविष्य आहे, असं हरभजन म्हणाला. तसंच त्याने संजूला मोलाचा सल्ला दिला आहे. India vs Australia 2020 Harbhajan Singh give big advice to Sanju Samson

संजू चुकांमधून शिकेल – हरभजन सिंह

“संजूने आपल्या चुकांमधून शिकायला हंव, असं केल्यास तो नक्की प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा बनवण्यास यशस्वी ठरेल. संजूला या टी 20 मालिकेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. संजूचा हा पहिला आणि दुसराच दौरा आहै. तो अजूनही शिकतोय. संजूमध्ये टीम इंडियाला मालिका जिंकवून देण्याची क्षमता आहे. संजू टीम इंडियाचा भविष्य आहे. संजू चुकीतून धडा घेईल. संजू आपल्या चुका सुधारेल. या चुकांमधून तो आणखी शिकेल.

संजूला हरभजनकडून सावधानतेचा इशारा

“तसेच संजूने वेळीच आपल्या खेळात सुधारणा करायला हवी. तसं न केल्यास दुसराच खेळाडू त्याची जागा घेऊ शकतो. संघामध्ये चौथा क्रमांकावरच्या फलंदाजा आणि क्रमाला महत्व आहे. यामुळे तुम्हाला संधी मिळाली आहे, तर त्याचं सोनं करा. या दौऱ्यात चमकदार कामगिरी केली नाही. पुढील दौऱ्यात संजूने उल्लेखनीय कामगिरी करायला हवी”, असा सल्लाही हरभजनने दिला.

टी 20 कारकिर्द

संजू सॅमसनने 2015 मध्ये टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. संजूला आतापर्यंत टी 20 मध्ये खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. संजूने आपल्या टी 20 कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 83 धावाच केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

ICC T20I Batting Rankings | विराट आणि केएलची टी 20 मालिकेत शानदार कामगिरी, आयसीसी क्रमवारीत ‘या’ क्रमांकावर झेप

ICC T20 World Cup | “…तर टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत होईल”

India vs Australia 2020 | टीम इंडियाला कसोटी मालिकेत विराटची उणीव भासेल : सचिन तेंडुलकर

India vs Australia 2020 Harbhajan Singh give big advice to Sanju Samson

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.