India vs Australia 2020 | हार्दिक पंड्या टीम इंडियाचा परिपक्व फलंदाज, हरभजन सिंहकडून हार्दिकचं कौतुक

टीम इंडियाने टी 20 मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे.

India vs Australia 2020 | हार्दिक पंड्या टीम इंडियाचा परिपक्व फलंदाज, हरभजन सिंहकडून हार्दिकचं कौतुक
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:05 PM

नवी दिल्ली : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा (India Tour Australia 2020) दुसऱ्या टी 20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली. टीम इंडियाचा हा सलग 10 वा टी 20 विजय ठरला. टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. पंड्याने 22 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. पंड्याने आपल्या या खेळीनं अनेक आजी माजी क्रिकेटपटूंना प्रभावित केलं आहे. टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहने (Harbhajan Singh) हार्दिकचं कौतुक केलं आहे. India vs Australia 2020 Hardik Pandya Team India’s mature batsman said Harbhajan Singh

पंड्या आंद्रे रसेलपेक्षा भारी

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, “हरभजन पंड्याच्या खेळीमुळे प्रभावित झाला आहे. हार्दिकच्या विश्वासात दिवसेंदिवस भर पडतेय. हार्दिक टीम इंडियाचा बेस्ट फिनिशर आहे. हार्दिक वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेल (Andrey Russell) इतकाच किंवा त्यापेक्षा सर्वोत्तम आहे. हार्दिक आपल्या इच्छेनुसार फटकेबाजी करतो. तसेच षटकारही खेचतो”, असं म्हणत हरभजनने हार्दिकचं कौतुक केलं.

जबाबदारीने सामन्याचा शेवट केला

“हार्दिक सुरुवातीपासूनच प्रतिभावान खेळाडू आहे. तो मोठे सिक्सर लगावू शकतो, याबद्दल आम्हाला खात्री होती. मात्र आता हार्दिक सातत्याने चांगली खेळी करतोय. हार्दिक तंत्रशुद्ध खेळी करतो. हार्दिक एकेरी धावाही घेऊ शकतो. हार्दिक फार परिपक्व फलंदाज आहे. त्याने टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका पार पाडली. त्याने जबाबदारीने सामना संपवला. ही समाधानकारक बाब आहे, असंहरभजनने नमूद केलं.

“हार्दिक फार आक्रमक फलंदाज आहे. तसेच तो तितकाच समजदारही आहे. कोणत्या गोलंदाजाविरोधात संयमाने खेळायचं आणि कोणाविरोधात फटकेबाजी करायची, हे त्याला चांगलंच ठावूक आहे. पांड्यात असलेली परिपक्वता पाहून बरं वाटतं. इतर फलंदाजांच्या तुलनेत हार्दिकची फलंदाजी उत्तम आहे. आगामी सामन्यात त्याने गोलंदाजी केली तर ते सोन्याहून पिवळं असेल”, असंही हरभजन म्हणाला. पंड्याने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यात केलेल्या नाबाद विजयी खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील प्रत्येक बाउंड्रीला एक चुंबन देईन, बॅनर घेऊन आलेल्या मुलीचा फोटो चर्चेत

India vs Australia 2020 2nd T20 Updates : हार्दिकची फटकेबाजी, धवनचे अर्धशतक, अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने मात, सीरिजही जिंकली

India vs Australia 2020 Hardik Pandya Team India’s mature batsman said Harbhajan Singh

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.