India vs Australia 2020, 3rd ODI Updates | अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी मात
हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा टीम इंडियाचे शिल्पकार ठरले.
कॅनबेरा : अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांनी सनसनाटी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 303 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 289 धावांवरच रोखले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार अॅरॉन फिंचने सर्वाधिक 75 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने 59 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर पदार्पण केलेल्या थंगारासून नटराजन आणि जसप्रीत बुमराह या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. तर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या फिरकी जोडीने प्रत्येकी 1 फलंदाजाला माघारी पाठवलं. india vs australia 2020 ind vs aus second one day international match live score update लाईव्ह स्कोअरकार्ड
A well deserved Man of the Match award for @hardikpandya7 for his unbeaten knock of 92.#AUSvIND pic.twitter.com/KOH2yA7tIW
— BCCI (@BCCI) December 2, 2020
विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने झटके दिले. मार्नस लाबुशाने आणि स्टीव्ह स्मिथचा अपवाद वगळता इतर सर्व फंलदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र तरीही या फलंदाजांना ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देता आला नाही.
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का मार्नस लाबुशानेच्या रुपात लागला. मार्नसला पदार्पण केलेल्या थंगारासूने 7 धावांवर बोल्ड केलं. यानंतर ऑस्ट्रेलियाला स्टीवह स्मिथच्या रुपात दुसरा आणि मोठा धक्का लागला. स्टीव्हने टीम इंडियाविरोधात याआधीच्या दोन्ही सामन्यात शतकी कामगिरी केली होती. शार्दुलने स्टीव्हला केएल राहुलच्या हाती 7 धावांवर कॅचआऊट केलं.
यानंतर कर्णधार अॅरॉन फिंच आणि मोईसेस हेनरिकेस या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 61 धावा जोडल्या. ही जोडी मैदानात सेट झाली होती. मात्र शार्दूलला ही जोडी फोडण्यास यश आले. शार्दूलने हेनरिकेसला 22 धावांवर बाद केलं. हेनरिकेस पाठोपाठ काही ओव्हरनंतर कर्णधार फिंचही बाद झाला. फिंचला फिरकीपटू रवींद्र जडेजाने शिखर धवनच्या हाती झेलबाद केलं. फिंचने 82 चेंडूत 7 फोर आणि 3 सिक्ससह 75 धावांची खेळी केली.
कॅमरॉन ग्रीनच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का बसला. ग्रीनने 21 धावा केल्या. ग्रीनला कुलदीप यादवने रवींद्र जडेच्या हाती झेलबाद केलं. अॅलेक्स कॅरीच्या रुपात ऑस्ट्रेलियाने सहावी विकेट गमावली. कॅरी चोरटी धाव घेण्याच्या नादात 38 धावांवर झाला. कॅरीला विराट कोहलीने रनआऊट केलं.
यानंतर ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. मॅक्सवेलने एश्टन अॅगरच्या जोडीने सातव्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. यामुळे सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजून झुकला. मात्र ही जोडी बुमराहने फोडली. बुमराहने आक्रमक खेळी करणाऱ्या मॅक्सवेलला 59 धावांवर बोल्ड केलं. मॅक्सवेलने 38 चेंडूत 3 फोर आणि 4 सिक्सच्या साहाय्याने तडाखेदार 59 धावा केल्या.
यानंतर ऑस्ट्रेलियाने एकामागोमाग एक विकेट गमावली. टीम इंडियाकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर पदार्पण केलेल्या थंगारासून नटराजन आणि जसप्रीत बुमराह या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. तर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या फिरकी जोडीने प्रत्येकी 1 फलंदाजाला माघारी पाठवलं.
कांगारुंनी मालिका जिंकली
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला असला तरी ऑस्ट्रेलियाने याआधीच 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 2-1 अशा फरकाने एकदिवसीय मालिका जिंकली आहे. दरम्यान आता एकदिवसीय मालिकेनंतर टी 20 मालिका खेळण्यात येणार आहे. ही टी 20 मालिका एकूण 3 सामन्यांची होणार आहे. या मालिकेला 4 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
[svt-event title=”टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय” date=”02/12/2020,5:06PM” class=”svt-cd-green” ]
India vs Australia 2020, 3rd ODI Updates | अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी मात https://t.co/A1au7bwxdi #INDvsAUS2020 #HardikPandya #Pandya #Jadeja #Jaddu #Bumrah #BOOMBOOM
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 25 धावांची आवश्यकता, सामना रंगतदार स्थितीत ” date=”02/12/2020,4:49PM” class=”svt-cd-green” ]
India vs Australia 2020, 3rd ODI Updates | ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 25 धावांची आवश्यकता, सामना रंगतदार स्थितीत https://t.co/A1au7bwxdi #INDvsAUS2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका” date=”02/12/2020,3:37PM” class=”svt-cd-green” ]
India vs Australia 2020, 3rd ODI Updates | ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका, कॅमरॉन ग्रीन आऊट https://t.co/A1au7bwxdi #INDvsAUS2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला चौथा झटका, अॅरॉन फिंच आऊट ” date=”02/12/2020,3:07PM” class=”svt-cd-green” ]
India vs Australia 2020, 3rd ODI Updates | ऑस्ट्रेलियाला चौथा झटका, अॅरॉन फिंच आऊट https://t.co/A1au7bwxdi #INDvsAUS2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का” date=”02/12/2020,2:50PM” class=”svt-cd-green” ]
India vs Australia 2020, 3rd ODI Updates | ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, मोईसेस हेनरिकेस आऊट https://t.co/A1au7bwxdi #INDvsAUS2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका” date=”02/12/2020,2:05PM” class=”svt-cd-green” ]
India vs Australia 2020, 3rd ODI Updates | ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका, स्टीव्ह स्मिथ 7 धावांवर बाद https://t.co/A1au7bwxdi #INDvsAUS2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का ” date=”02/12/2020,1:37PM” class=”svt-cd-green” ]
India vs Australia 2020, 3rd ODI Updates | ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, मार्नस लाबुशाने माघारी, थंगारासू नटराजनची पहिली वनडे विकेट https://t.co/A1au7bwxdi #INDvsAUS2020 #ThanagarasuNatrajan #TNatrajan
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात” date=”02/12/2020,1:19PM” class=”svt-cd-green” ]
India vs Australia 2020, 3rd ODI Updates | ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 303 धावांचे आव्हानhttps://t.co/A1au7bwxdi #INDvsAUS2020 #IndiaTourAustralia2020_21
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 303 धावांचे आव्हान ” date=”02/12/2020,12:50PM” class=”svt-cd-green” ]
India vs Australia 2020, 3rd ODI Updates | हार्दिकची फटकेबाजी, विराट-जडेजाची अर्धशतकी खेळी, टीम इंडियाकडून कांगारुंना विजयाासाठी 303 धावांचे आव्हानhttps://t.co/A1au7bwxdi #ViratKohli #RavindraJadeja #HardikPandya #Pandya #INDvsAUS2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”हार्दिक पांड्याचे दमदार अर्धशतक ” date=”02/12/2020,12:06PM” class=”svt-cd-green” ]
Hardik Pandya scores his 6️⃣th ODI fifty!
This is the second time that he has made two half-centuries in a bilateral ODI series.#AUSvIND pic.twitter.com/2Ki8YLZYnA
— ICC (@ICC) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”टीम इंडियाचा 40 ओव्हरनंतर स्कोअर ” date=”02/12/2020,11:52AM” class=”svt-cd-green” ]
India vs Australia 2020, 3rd ODI | टीम इंडिया 40 ओव्हरनंतर 192-5 (40 Over) रवींद्र जडेजा 11*, हार्दिक पांड्या 39* https://t.co/A1au7bwxdi #ViratKohli #TeamIndia #IndiaCricketTeam #IndiavsAus #IndiavsAustralia2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”टीम इंडियाला पाचवा धक्का” date=”02/12/2020,11:39AM” class=”svt-cd-green” ]
India vs Australia 2020, 3rd ODI | टीम इंडियाला पाचवा धक्का, कर्णधार विराट कोहली बाद https://t.co/A1au7bwxdi#ViratKohli #TeamIndia #IndiaCricketTeam #IndiavsAus #IndiavsAustralia2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”विराट कोहलीचे झुंजार अर्धशतक” date=”02/12/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ]
Second successive fifty for Captain Kohli! ??
Will he take #TeamIndia to a formidable total? #AUSvIND
India 133/4 after 28 overs.
Scorecard:. https://t.co/VO9QlU3cB6 pic.twitter.com/y2SH2Pl0hP
— BCCI (@BCCI) December 2, 2020
[svt-event title=”वेगवाग 12 हजारी विराट” date=”02/12/2020,11:40AM” class=”svt-cd-green” ]
12000 ODI runs for King Kohli ?
He’s the fastest to achieve this feat ??#TeamIndia pic.twitter.com/5TK4s4069Y
— BCCI (@BCCI) December 2, 2020
[/svt-event]
[/svt-event]
[svt-event title=”टीम इंडियाला चौथा धक्का” date=”02/12/2020,10:57AM” class=”svt-cd-green” ]
India vs Australia 2020, 3rd ODI Updates | टीम इंडियाला चौथा धक्का, केएल राहुल बाद https://t.co/A1au7bwxdi #KLRahul #INDvsAUS2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”टीम इंडियाला तिसरा धक्का” date=”02/12/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ]
India vs Australia 2020, 3rd ODI Updates | टीम इंडियाला तिसरा धक्का, श्रेयस अय्यर माघारीhttps://t.co/A1au7bwxdi #ShreyasIyer #INDvsAUS2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”टीम इंडियाला दुसरा धक्का ” date=”02/12/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ]
India vs Australia 2020, 3rd ODI Updates | टीम इंडियाला दुसरा धक्का, शुभमन गिल बाद https://t.co/A1au7bwxdi #INDvsAUS #IndiaTourAustralia2020 #ShubhamanGill
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”टीम इंडियाचा 10 ओव्हरनंतरचा स्कोअर” date=”02/12/2020,9:58AM” class=”svt-cd-green” ]
At the end of 10 overs #TeamIndia are 49/1
Live – https://t.co/ceZGxBCOZg #AUSvIND pic.twitter.com/Funq6wkMMU
— BCCI (@BCCI) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”टीम इंडियाला पहिला धक्का, ‘गब्बर’ शिखर धवन आऊट ” date=”02/12/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ]
3rd ODI. 5.5: WICKET! S Dhawan (16) is out, c Ashton Agar b Sean Abbott, 26/1 https://t.co/V0mKhkiOZw #AusvInd
— BCCI (@BCCI) December 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”ऑस्ट्रेलियातील बदल ” date=”02/12/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ] ऑस्ट्रेलियामध्ये जखमी डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. तर मिशेल स्टार्कसला आराम देण्यात आलाय. कॅमरन ग्रीनची आज डेब्यू वनडे मॅच आहे. याशिवाय शॉन एबट, डार्सी शॉर्ट आणि एस्टन एगर यांना संधी मिळाली आहे. [/svt-event]
[svt-event title=”टीम इंडीयामध्ये ४ बदल ” date=”02/12/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ] सलामीवर मयांक अग्रवालच्या जागी शुभनम गिल, नवदीप सैनीच्या जागी थंगारासू नटराजन, मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूर आणि युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. [/svt-event]
[svt-event title=”टीम इंडियाचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय” date=”02/12/2020,9:55AM” class=”svt-cd-green” ]
Tails was the call and tails it is. Captain @imVkohli has won the toss and #TeamIndia are batting first in the 3rd ODI. #AUSvIND pic.twitter.com/ei4x2aqpAt
— BCCI (@BCCI) December 2, 2020
[/svt-event]
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान
टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाचे फलंदाजांनी मागील दोन्ही सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली आहे. तसेच स्टीव्ह स्मिथनेही सलग दोन सामन्यात शतकी कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाला शेवटचा सामना जिंकायचा असेल, तर ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या तसेच मधल्या फळीतील फलंदाजांना स्वसतात बाद केल्याशिवाय पर्याय नाही.
मोठे बदल होण्याची शक्यता
टीम इंडियाचे गोलंदाज पहिल्या 2 सामन्यात सपशेल अपयशी ठरले. जसप्रीत बुमराह टीम इंडियाच्या गोलंदाजाीचा कणा आहे. मात्र बुमराहलाही 2 सामन्यात चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात काही बदल केले जामार असल्याची शक्यता आहे. यानुसार या सामन्यासाठी मोहम्मद शमीच्या जागेवर शार्दुल ठाकूर तर सैनीच्या जागेवर थंगारासू नटराजनला संधी मिळू शकते. तसेच कुलदीपला युजवेंद्र चहलच्या जागी समाविष्ट केले जाऊ शकते.
टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर आणि थंगारासू नटराजन.
टीम ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झॅम्पा, जोश हेजलवुड, सीन एबॉट, एश्टन एगर, कॅमरन ग्रीन, मोइजेस हेनरिक्स, अँड्रयू टाय, डॅनियल सॅम्स आणि मॅथ्यू वेड.
संबंधित बातम्या :
India vs Australia 2020 | सलग 2 पराभव, तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता
India vs Australia 1st ODI : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कमाल, भारताचा 66 धावांनी पराभव
india vs australia 2020 ind vs aus second one day international match live score update