India vs Australia 2020 | आयपीएलमुळे आत्मविश्वास, ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी सज्ज : मोहम्मद शमी
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20, आणि कसोटी मालिका खेळणार आहे.
सिडनी : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ( India Tour Australia 2020) सज्ज झाली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होत आहे. एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया नेट्समध्ये जोरदार सराव करत आहे. “आयपीएलमधील कामगिरीमुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे मी सध्या सकारात्मक मनस्थितीत आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्याने मी दबावमुक्त झालोय. या आत्मविश्वासामुळे मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे”, असं टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) म्हणाला आहे. बीसीसीआय डॉट कॉमला (BCCI) दिलेल्या मुलाखतीत शमीने ही प्रतिक्रिया दिली. india vs australia 2020 ipl boosts confidence relieves pressure ready to beat australia said mohammad shami
“आगामी म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी मला या आत्मविश्वासाचा फायदा झाला आहे. मी या आत्मविश्वासामुळे कोणत्याही दबावाशिवाय तयारी करु शकतोय. मी लॉकडाऊनच्या काळात वेळेचा सदुपयोग केला. लॉकडाऊनमध्ये गोलंदाजी आणि फिटनेसवर मी लक्ष दिलं. कोणत्याही परिस्थितीत आयपीएलंच आयोजन होणारच, याची मला खात्री होती. यादृष्टीने मी सरावाला लागलो होतो”, असंही शमी म्हणाला. दरवर्षी आयपीएलचं आयोजन हे मार्च-मे दरम्यान केलं जातं. मात्र यंदा कोरोनामुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं वेळापत्रक रद्द करण्यात आलं. त्यानंतर नव्या वेळापत्रकानुसार यूएईमध्ये आयपीएलंच आयोजन केलं गेलं.
“या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आम्हाला एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळायची आहे. मी कसोटी क्रिकेटला प्राधान्य देतो. मी गेल्या आठवड्यापासून नेट्समध्ये कसून सराव करतोय. माझं लक्ष्य नेहमीच कसोटी क्रिकेटकडेच असतं. तसेच मी माझ्या गोलंदाजीवर आणखी मेहनत घेतोय”, असंही शमीने नमूद केलं.
The master and his apprentice
When @MdShami11 and Siraj bowled in tandem at #TeamIndia's nets. Fast and accurate! ?? pic.twitter.com/kt624gXp6V
— BCCI (@BCCI) November 17, 2020
शमीची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी
शमीने आयपीएलच्या या मोसमात कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ कामगिरी केली. शमीने या 13 व्या मोसमात पंजाबकडून खेळताना एकूण 14 सामन्यात 20 विकेट्स घेतल्या. तसेच मुंबईविरुद्ध डबल सुपर ओव्हरमध्ये केवळ 5 धावा देत महत्वाची भूमिका बजावली होती.
शमी दबदबा कायम राखणार?
टीम इंडियाचा वेगवान आणि महत्वाचा गोलंदाज मोहम्मद शमी. शमी 2019 मध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. शमीने 2019 मध्ये 21 सामन्यात 42 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. त्यामुळे यावेळेसही शमीकडून अशाच धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. शमी आपला दबदबा कायम राखण्यात यशस्वी ठरणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
The wait is over. @cheteshwar1 is back in the nets and is back to doing what he loves the most. Bowlers be prepared for a long workout. #TeamIndia pic.twitter.com/uAKEBE9PQf
— BCCI (@BCCI) November 19, 2020
मालिकानिहाय सामन्यांचं वेळापत्रक
एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल
टी-20 मालिका
पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी
कसोटी (टेस्ट) मालिका
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
संबंधित बातम्या :
India vs Australia 2020 | मालिका जिंकण्यासाठी गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरणार : झहीर खान
india vs australia 2020 ipl boosts confidence relieves pressure ready to beat australia said mohammad shami