India vs Australia 2020 | अय्यरची निर्णायक विकेट, कोहलीचा अफलातून कॅच, हेनरिक्सने मॅच फिरवली
ऑस्ट्रेलियाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
सिडनी : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात (India vs Australia 2020) खराब राहिली. ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावं लागलं. कांगारुंनी पहिल्या सामन्यात 66 तर दुसऱ्या सामन्यात 51 धावांनी मात केली. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला होता. मार्कस स्टोयनिसला दुखापत झाल्याने हा बदल करण्यात आला. स्टोयनिसच्या जागी संघात अष्टपैलू खेळाडू मोईसेस हेनरिक्सला (Moises Henriques) संधी दिली. या संधीचं हेनरिक्सने सोनं केलं. हेनरिक्सने या सामन्यात महत्वाची तसेच निर्णायक भूमिका बजावली. त्याने 7 ओव्हर गोलंदाजी केली. यामध्या त्याने 34 धावा देत श्रेयस अय्यरची महत्वपूर्ण विकेट घेतली. तसेच एका कॅचमुळं सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं झुकला. india vs australia 2020 Iyer decisive wicket kohli super catch moises henriques brilliant performance in 2nd odi
निर्णायक वेळी अय्यरची विकेट
हेनरिक्सने ऑस्ट्रेलियासाठी एक विकेट आणि एक कॅच घेतला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 390 धावांचे आव्हान दिले होते. या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना टीम इंडियाची योग्य सुरुवात झाली. मात्र अर्धशतकी भागीदारीनंतर शिखर धवन आणि मयंक अग्रवाल ही सलामी जोडी माघारी परतली. त्यामुळे टीम इंडियाची 60-2 अशी स्थिती झाली. यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोन्ही खेळाडूंनी मैदानात घट्ट पाय रोवले होते. मात्र ही जोडी तोडायला हेनरिक्सला यश आलं. हेनरिक्सने निर्णायक क्षणी ऑस्ट्रेलियाला ब्रेक थ्रू मिळवून दिला.
अय्यरने हेनरिक्सच्या गोलंजादीवर पुल शॉट मारण्याच्या प्रयत्न केला. मात्र अय्यरने मारलेला फटका मिडविकेटवर असलेल्या स्टीव्ह स्मिथच्या दिशेने गेला. स्टीव्ह स्मिथने कोणतीही चूक न करता कॅच घेतला. त्यामुळे हेनरिक्सने निर्णायक क्षणी विकेट मिळवून दिला. हेनरिक्सने अय्यरला 38 धावांवर बाद केलं.
विराटचा अफलातून कॅच
अय्यर बाद झाला. त्यानंतर उप कर्णधार केएल राहुल मैदानात आला. विराट-केएल या दोघांनी टीम इंडियाचा स्कोअरबोर्ड धावता ठेवता. दोघांमध्ये 72 धावांची आश्वासक भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाला आता विकेटची गरज होती. यावेळेसही हेनरिक्स संघासाठी धावून आला.
The most important wicket of the innings, and what a catch it was!
Moises Henriques ??#AUSvINDpic.twitter.com/v16fhXvUzh
— ICC (@ICC) November 29, 2020
जोश हेझलवूड 35 वी ओव्हर टाकत होता. विराट 89 धावांवर खेळत होता. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर विराटने फटका मारला. मात्र हेनरिक्सने हवेत झेपावत विराटचा अफलातून कॅच घेतला. हा कॅच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. हेनरिक्सने 89 धावांवर विराटचा कॅच घेतला. यानंतर सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं झुकला.
भारताविरोधात एकदिवसीय पदार्पण
हेनरिक्सने 31 ऑक्टोबर 2009 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाविरोधात एकदिवसीय पदार्पण केलं होतं. हेनरिक्सला यानंतर फार खेळण्याची संधी मिळाली नाही. हेनरिक्सने आतापर्यंत एकूण 12 एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये त्याने 8 विकेट्स घेतल्या. आहेत. तसेच हेनरिक्सने 4 कसोटी आणि 11 टी 20 सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 2 आणि 4 विकेट्स घेतल्या आहेत.
तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला
या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्न असणार आहे. या एकदिवसीय मालिकेनंतर 3 टी 20 सामन्यांची आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
Ind Vs Aus 2020 | ‘पाँच का पंच’, ऑस्ट्रेलियाच्या टॉप 5 फलंदाजांची धमाकेदार खेळी
india vs australia 2020 Iyer decisive wicket kohli super catch moises henriques brilliant performance in 2nd odi