India vs Australia 2020 | कर्णधार विराटकडून टीम इंडियाच्या पराभवाचं खापर गोलंदाजांच्या माथी

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात टीम इंडियावर 51 धावांनी विजय मिळवला.

India vs Australia 2020 | कर्णधार विराटकडून टीम इंडियाच्या पराभवाचं खापर गोलंदाजांच्या माथी
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 1:21 PM

सिडनी : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर (India Tour Australia 2020) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 51 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 390 धावांचे तगडे आव्हान दिले. मात्र टीम इंडियाला प्रत्युतरात निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावून 338 धावा करता आल्या. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टीम इंडियाच्या पराभवासाठी गोलंदाजांना जबाबदार धरलंय. सामन्यानंतर विराट कोहलीने याबाबत प्रतिक्रिया दिली. india vs australia 2020 second odi against australia was lost by the bowlers said captain virat kohli

विराट काय म्हणाला?

“ऑस्ट्रेलियाने आम्हाला पूर्णपणे पछाडलं. ऑस्ट्रेलिया आमच्यावर फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग या तिनही बाबतीत वरचढ ठरली. आम्ही गोलंदाजीने प्रभावी मारा करण्यास अपयशी ठरलो. ऑस्ट्रेलियाची बॅटिंग ऑर्डर मजबूत आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना खेळपट्टीची चांगली जाण आहे. त्यामुळे त्यांनी चांगली कामगिरी केली”, अशी प्रतिक्रिया विराटने सामन्यानंतर दिली.

कॅचेस विन मॅच

“ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी उतकृष्ट फिल्डिंग केली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी माझी आणि श्रेयस अय्यरचा अफलातून कॅच घेतला. या कॅच या सामन्याच्या टर्निंग पॉईंट ठरल्या. मी आणि राहुल बोलत होतो की जर आपण 40-41 षटके खेळत राहिलो आणि शेवटच्या 10 षटकांत 100 धावा कराव्या लागल्या तर हार्दिक पांड्या आल्यास आम्ही धावा करू शकतो, ही आमची रणनीती होती. पण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी अफलातून कॅच पकडत सामना आपल्या बाजूने झुकवला”, असंही विराटने नमूद केलं.

ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यात ‘विराट’ कामगिरी

विराटने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यात 89 धावांची झुंजार खेळी केली. यासह त्याने या सामन्यात त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले. ऑस्ट्रेलियाविरोधातील हा दुसरा सामना विराटच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 250 वा सामना ठरला. तसेच विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 22 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो एकूण 8 वा तर टीम इंडियाचा तिसरा फलंदाज ठरला. तसेच विराटने ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वात कमी डावांमध्ये 2 हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरीही केली.

तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला

या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्न असणार आहे. या एकदिवसीय मालिकेनंतर 3 टी 20 सामन्यांची आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | वॉर्नर संघाबाहेर राहिला तर टीम इंडियासाठी फायदेशीरच, ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या दुखापतीवर केएलची प्रतिक्रिया

IND vs AUS: कांगारुंना दुहेरी झटका, दोन दिग्गज खेळाडू एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतून बाहेर

india vs australia 2020 second odi against australia was lost by the bowlers said captain virat kohli

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.