India vs Australia 2020 | टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांडयाची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी

हार्दिकला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत स्थान देण्यात आलं आहे.

India vs Australia 2020 | टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांडयाची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 12:18 PM

सिडनी : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात (India Tour Australia 2020) एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत प्रत्येकी 3 सामने खेळण्यात येणार आहे. तर कसोटी मालिका 4 सामन्यांची असणार आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू या एकदिवसीय आणि टी 20 मालिकेतून संघात पुनरागमन करतोय. विशेष म्हणजे हार्दिकने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच टी 20 क्रिकेट पदार्पण केलं होतं. यानिमित्ताने आपण हार्दिकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली कामगिरी पाहणार आहोत. india vs australia 2020 team india all rounder hardik pandya performance against australia

कांगारुंविरुद्धची एकदिवसीय सामन्यातील कामगिरी

हार्दिक ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 6 एकदिवसीय सामने खेळला आहे. या 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये हार्दिकने 54 च्या सरासरीने 270 धावा केल्या आहेत. 83 ही पांड्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच हार्दिकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्सही घेतल्या आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 मध्ये हार्दिकला काही विशेष काही करता आलेले नाही.

हार्दिकला 1000 धावा पूर्ण करण्याची संधी

हार्दिकला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत वनडे कारकिर्दीतील 1 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. हार्दिकने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 54 सामन्यात 957 धावा केल्या आहेत. त्यामुळे हार्दिकने 43 धावा पूर्ण केल्यास त्याच्या 1000 हजार धावा पू्र्ण होणार आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे-टेस्टमध्ये खेळला नाही

पांड्याने या 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑस्ट्रेलियावरुद्ध 3 टी 20 सामने खेळले होते. मात्र त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाही. हार्दिक आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये वनडे आणि कसोटी सामने खेळला नाहीये. मात्र यावेळेस हार्दिकला एकदिवसीय मालिकेत खेळण्याची संधी आहे. हार्दिकने आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना धमाकेदार कामगिरी केली होती. हार्दिक अशीच कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध करेल, अशी अपेक्षा आहे.

हार्दिकने टीम इंडियाकडून 40 टी 20 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 310 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 38 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच हार्दिकने 54 एकदिवसीय सामन्यात 957 धावा केल्या आहेत. यासह त्याने 54 विकेट्स मिळवल्या आहेत. हार्दितने एकूण 11 कसोटी सामन्यांमध्ये 532 धावांसह 17 फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

मालिकानिहाय वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराटला सचिनचे हे 2 विक्रम मोडित काढण्याची संधी

India vs Australia 2020 | वेगवान 12 हजारी विराट, शंभर नंबरी चहल, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहली-युजवेंद्रला विक्रमाची संधी

India Vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीला ‘विराट’ कामगिरी करण्याची संधी

india vs australia 2020 team india all rounder hardik pandya performance against australia

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.