India vs Australia 2020 | कांगारुनी धू धू धुतला, फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या नावे नकोसा विक्रम

पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव केला.

India vs Australia 2020 | कांगारुनी धू धू धुतला, फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या नावे नकोसा विक्रम
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 4:09 PM

सिडनी : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (India Tour Australia) पहिल्या एकदिवसीय सामन्यात 66 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारा फिरकीपटू युजवेंद्र चहल  (Yuzvendra Chahal) या पहिल्या सामन्यात अयशस्वी ठरला. चहल या पहिल्या सामन्यातील टीम इंडियाचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. यासह चहलच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे. india vs australia 2020 team india spinner yuzvendra chahal sets bad record against australia first odi

काय आहे विक्रम?

या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. फिरकीपटू चहलच्या गोलंदाजीवर कांगारुंच्या फलंदाजांनी चांगलीच फटकेबाजी केली. चहलने 10 ओव्हरमध्ये 89 धावा लुटवल्या. यासह चहल एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा देणारा भारतीय फिरकीपटू ठरला आहे. विशेष म्हणजे त्याने स्वत:चा विक्रम मोडित काढला आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कप 2019 मध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात चहलने 88 धावा लुटवल्या होत्या.

चहलच्या आधी लेग स्पीनर पियूष चावलाच्या नावे सर्वाधिक धावा लुटवण्याचा विक्रम होता. पाकिस्तानविरोधात 2008 मध्ये सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात पियूषने 10 ओव्हरमध्ये 85 धावा दिल्या होत्या.

सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा लुटवल्या आहेत. भुवनेश्वरने 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्या 10 ओव्हरमध्ये चक्क 105 धावा दिल्या होत्या. हा सामना मुंबईत खेळण्यात आला होता.

सर्वाधिक महागडा गोलंदाज

एकदिवसीय सामन्यात सर्वाधित धावा देण्याचा नकोसा विक्रम ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिक लुईसच्या नावे आहे. लुईसने दक्षिण आफ्रिकेविरोधात 10 ओव्हरमध्ये 113 धावा दिल्या होत्या.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | कुगं फु पांड्या ! हार्दिकची झुंजार खेळी, विक्रमाला गवसणी

Photo | IND vs AUS : सिडनी वनडेमध्ये ‘या’ पाच कारणांमुळे भारताचा पराभव, कांगारुंची दादागिरी!

india vs australia 2020 team india spinner yuzvendra chahal sets bad record against australia first odi

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.