India vs Australia 2020 | “तर टीम इंडियाला कसोटी मालिकेत 4-0 च्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागेल”

कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

India vs Australia 2020 | तर टीम इंडियाला कसोटी मालिकेत 4-0 च्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागेल
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 5:15 PM

सिडनी : भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची (India Tour Australia 2020) सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होत आहे. या एकदिवसीय सामन्यांनंतर टी 20 मालिका खेळण्यात येणार आहे. एकदिवसीय आणि टी 20 च्या तुलनेत क्रिकेटचाहत्यांचं लक्ष हे कसोटी मालिकेकडे लागलेले आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ही प्रतिष्ठेची समजली जाते. त्यामुळे या कसोटी मालिकेला महत्त्व प्राप्त झालं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने (Michael Clarke) या कसोटी मालिकेबद्दल मोठं विधान केलं आहे. “टीम इंडियाने एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत विजय मिळवला नाही, तर टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा 4-0 च्या फरकाने पराभव होईल”, अशी भविष्यवाणी क्लार्कने केली आहे. sky sports radio सोबत बोलताना क्लार्कने हे विधान केलं आहे. india vs australia 2020 team india will have to face a 4-0 defeat in the test series said former australia captain michael clarke

क्लार्क काय म्हणाला?

टीम इंडियाला एकदिवसीय आणि टी 20 मालिकेपासूनच विजयी लय प्राप्त करायली हवी. कर्णधार विराट कोहलीने आपल्या नेतृत्वात एकदिवसीय आणि टी 20 मालिकेतील सामन्यात विजय मिळवून द्यावा. असं न झाल्यास टीम इंडिया दबावात येईल. या दबावाचा परिणाम कसोटी मालिकेदरम्यान दिसेल. तसेच विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. त्यामुळे टीम इंडिया विराटच्या अनुपस्थितीत 3 कसोटी सामन्यात अडचणीत येईल. त्यामुळे टीम इंडियाने एकदिवसीय आणि टी 20 मालिकेपासून विजयी लय पकडायला हवी. जर टीम इंडियाला हा विजयी सूर गवसला नाही, तर कसोटी मालिकेतील सर्वच्या सर्व म्हणजेच 4 सामन्यांमध्ये टीम इंडिया पराभूत होईल”, असंही क्लार्क म्हणाला.

विराट कसोटी मालिकेतील पहिलाच सामना खेळणार आहे. यानंतर विराट भारतात परतणार आहे. विराट बाबा होणार असल्याने बीसीसीआयने त्याला पालक्त्वाची रजा मंजूर केली आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

रोहित-इशांत कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

रोहित शर्मा आणि इशांत शर्मा हे दोघे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार इशांत आणि रोहितच्या दुखापतीत अपेक्षित अशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणं आतातरी अशक्य वाटतंय. यामुळे टीम इंडियाच्या चिंतेत अजून भर पडली आहे.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी 3 सामन्यांची एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. यानंतर 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. टीम इंडियाने मागील दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत पराभव केला होता. मात्र आता ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरचे संघात पुनरागमन झालं आहे. तसेच विराट, रोहित आणि इशांत हे कसोटीमध्ये खेळणार नसल्याने टीम इंडियासमोर कांगारुंचे कडवे आव्हान असणार आहे.

मालिकानिहाय वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

Kapil Dev ODI XI | टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांची सर्वोत्कृष्ट एकदिवसीय टीम

रोहित-इशांत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार? टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ

india vs australia 2020 team india will have to face a 4-0 defeat in the test series said former australia captain michael clarke

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....