AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | मोठ्या लढतीची तयारी, शमी-बुमराहला विश्रांती?

17 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

India vs Australia 2020 | मोठ्या लढतीची तयारी, शमी-बुमराहला विश्रांती?
| Updated on: Nov 19, 2020 | 1:04 PM
Share

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Indian Tour Australia) सिडनीमध्ये कसून सराव करत आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. मोहम्मद शमी (Mohammed Shami)आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे टीम इंडियाचे प्रमुख गोलंदाज आहेत. वनडे आणि टी 20 च्या तुलनेत ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका प्रतिष्ठेची समजली जाते. या कसोटी मालिकेत बुमराह आणि शमीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. या दोघांना कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करता यावी, यासाठी या दोघांना एकदिवसीय आणि टी 20 मालिकेतील काही सामन्यांमधून विश्रांती देण्यात येऊ शकते. India Australia 2020 Will Mohammad Shami and Jaspreet Bumrah get a break from ODIs and T20s to prepare for the Test series

एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यानंतर टीम इंडिया टी 20 मालिका खेळणार आहे. टी 20 नंतर 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे.

“बुमराह आणि शमी सातत्याने क्रिकेट खेळताहेत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर सातत्याने खेळण्याबाबतचा वर्कलोड आहे. टीम मॅनेजमेंट या वर्कलोडबद्दल जागृत आहे. दुसऱ्या बाजूला इशांत शर्मा अजूनही पूर्णपणे दुखापतीतून सावरला नाही. इशातं कसोटी मालिकेआधी दुखापतीतून सावरेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. मात्र जर दुर्देवाने इशांत सावरला नाही, तर कसोटी मालिकेत सर्व जबाबदारीही शमी-बुमराहवर येईल. तसेच कसोटीच भरीव कामगिरी करता यावी, या उद्देशाने या दोघांना एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात येऊ शकते. किंवा या दोघांना एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत आलटून पालटून खेळवले जाऊ शकते”, अशी माहिती बीसीसीआयच्या काही सूत्रांनी पीटीआयला दिली आहे.

“इशांतच्या दुखापतीमुळे टीम मॅनेंजमेंट चांगलीच खबरदार झाली आहे. त्यामुळे इशांतसारखंच इतर कोणत्या खेळाडूला दुखापत होऊ नये, यासाठी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण दोघेही शमी आणि बुमराहबद्दल अधिक काळजी घेत आहेत”, अशीही माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला दिली.

मागील दौऱ्यातील कामगिरी

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा मागील दौऱ्यात कसोटी मालिकेत 2-1 च्या फरकाने पराभव केला होता. या कसोटी मालिकेत मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या जोडीने पावरफुल कामगिरी केली होती. या कसोटी मालिकेत बुमराहने 21 तर शमीने 16 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अ‌ॅडिलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अ‌ॅडिलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

India Future Tour Program 2021 | आशिया चषक, इंग्लंड दौरा, T 20 वर्ल्ड कप, टीम इंडियाचा 2021 मध्ये भरगच्च दौरा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

IND vs AUS | अ‌ॅडिलेडमध्ये कोरोनाने डोकं वर काढलं, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीचं काय होणार?

India Australia 2020 Will Mohammad Shami and Jaspreet Bumrah get a break from ODIs and T20s to prepare for the Test series

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.