India vs Australia, 3rd Odi | हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा जोडीची दीडशतकी भागीदारी, ऑस्ट्रेलियाविरोधात विक्रमाला गवसणी
या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 108 चेंडूत नाबाद 150 धावांची भागीदारी केली.
कॅनबेरा : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Team India Tour Australia) यांच्यात कॅनबेरामध्ये तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यात येत आहे. टीम इंडियाने पहिले बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 303 धावांचे आव्हान दिले. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा या जोडीने सहाव्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह या जोडीच्या नावे विक्रमाची नोंद झाली आहे. या जोडीने टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाविरोधात सहाव्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे. india vs australia 3rd odi hardik pandya and ravindra jadeja highest 6th wicket paartnership against australia in odi
काय आहे विक्रम
कर्णधार विराट कोहलीच्या रुपात टीम इंडियाला पाचवा धक्का लागला. त्यामुळे टीम इंडियाची 5 बाद 152 अशी स्थिती झाली. 250 धावा होतील की नाही, याबाबतही निश्चितता नव्हती. मात्र यानंतर रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. शेवटच्या 10 षटकात या जोडीने कांगारुंच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी शेवटच्या 10 ओव्हरमध्ये एकूण 110 तर शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 76 धावा केल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 108 चेंडूत नाबाद 150 धावांची भागीदारी केली. यासह टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाविरोधातील सहाव्या विकेटसाठी ही सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.
याआधी टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाविरोधात सहाव्या विकेटसाठी सदगोपन रमेश आणि रॉबिन सिंह या जोडीने ही कामिगरी केली होती. हा सामना 1999 मध्ये सिडनीत क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळण्यात आला होता. सदगोपन रमेश आणि रॉबिन सिंह या दोघांनी सहाव्या विकेटसाठी123 रन्सची पार्टनरशीप केली होती.
सहाव्या विकेटसाठी तिसरी बेस्ट पार्टनरशीप
टीम इंडियासाठी पांडया आणि जडेजा यांची ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. अंबाती रायुडू आणि स्टुअर्ट बिन्नी या जोडीने सहाव्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली होती. ही कामगिरी झिंबाब्वेविरोधात करण्यात आली होती. हा सामना हरारे येथे 2015 मध्ये खेळण्यात आला होता.
सहाव्या विकेटसाठी दुसरी सर्वोत्तम भागीदारीही झिंबाब्वेविरोधातच करण्यात आली होती. यावेळेस जोडी वेगळी होती. युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनीने 2005 मध्ये 158 धावांची भागीदारी केली होती. यानंतर पांड्या आणि जडेजा जोडीच्या भागीदारीचा तिसरा क्रमांक लागतो.
संबंधित बातम्या :
India vs Australia, 3rd Odi | ‘यॉर्कर किंग’ थंगारसू नटराजनचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण
India vs Australia 2020, 3rd ODI | वेगवान विराट, विश्वविक्रमाला गवसणी, सचिनचा विक्रम मोडित
india vs australia 3rd odi hardik pandya and ravindra jadeja highest 6th wicket paartnership against australia in odi