India vs Australia 2020, 3rd ODI | वेगवान विराट, विश्वविक्रमाला गवसणी, सचिनचा विक्रम मोडित

23 धावा पूर्ण करताच विराटने हा विश्वविक्रम केला.

India vs Australia 2020, 3rd ODI | वेगवान विराट, विश्वविक्रमाला गवसणी, सचिनचा विक्रम मोडित
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 11:38 AM

कॅनबेरा : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Indian vs Australia 3rd odi)यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यात येतोय. टीम इंडियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने Team India Captain Virat Kohli) विश्व विक्रमी कामगिरी केली आहे. कोहलीने एकदिवसीय सामन्यात वेगवान 12 हजार धावा करण्याची ‘विराट’ कामगिरी केली आहे. याआधी सर्वात कमी डावात 12 हजार धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावे होता. india vs australia 3rd odi team india captain virat kohli completed fastest 12,000 runs in odi

242 डावात 12 हजार धावा

विराटने 12 हजार धावांचा टप्पा 242 डावांमध्ये पार केला आहे. टीम इंडियाकडून सचिन तेंडुलकरने 300 डावात 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा सहावा खेळाडू ठरला आहे. कोहली आणि सचिन व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग, श्रीलंकेचा कुमार संगकारा, सनथ जयसूर्या आणि महेला जयवर्धनेनेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 हजार किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

डावनिहाय 12 हजार धावा

विराटने एकूण 242 डावांमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 300 डावांमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या. म्हणजेच सचिनच्या तुलनेत विराटने 58 डावांआधी ही कामगिरी केली आहे. तसेच ऑस्ट्रलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने 314, कुमार संगकाराने 336, सनथ जयसूर्याने 379 आणि महेला जयवर्धनेने 399 डावांमध्ये 12 हजार धावा केल्या आहेत.

विराटला सचिनच्या विक्रमाची बरोबरीची संधी

विराट कोहलीला या सामन्यात सचिनच्या एका विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरोधात एकूण 9 एकदिवसीय शतकं लगावली आहेत. तर विराटने ऑस्ट्रेलियाविरोधात एकदिवसीय सामन्यात 8 शतकं लगावली आहे. त्यामुळे विराटने या सामन्यात शतकं लगावलं तर, तो सचिनच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी करेल.

दरम्यान विराटने ऑस्चट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यात अनेक विक्रम केले. विराटने या दुसऱ्या सामन्यात 89 धावांची खेळी केली. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (एकदिवसीय, कसोटी आणि टी 20) 22 हजार धावा पूर्ण केल्या. तसेच विराटची ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसरी एकदिवसीय मॅच ही त्याच्या वनडेमधील 250 वी मॅच ठरली.

संबंधित बातम्या :

India vs Australia, 3rd Odi | ‘यॉर्कर किंग’ थंगारसू नटराजनचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण

India vs Australia 2020, 3rd ODI Updates | कर्णधार विराट कोहलीचे झुंजार अर्धशतक

india vs australia 3rd odi team india captain virat kohli completed fastest 12,000 runs in odi

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.