India vs Australia, 3rd Odi | ‘यॉर्कर किंग’ थंगारसू नटराजनचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण
थंगारासू टीम इंडियाकडून पदार्पण करणारा 232 वा खेळाडू ठरला आहे.
कॅनबेरा | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia 2020) यांच्यात आज 2 (डिसेंबर) तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यात येत आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात विजयासह मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा तिसरा सामना प्रतिष्ठेचा झाला आहे. या तिसऱ्या सामन्यात काही बदल करण्यात आले आहेत. या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज थंगारासू नटराजनला (Thangarasu Natrajan) संधी देण्यात आली आहे. थंगारासूने टीम इंडियाकडून वन डे पदार्पण केलं आहे. थंगारासू टीम इंडियाकडून पदार्पण करणारा 232 वा खेळाडू ठरला आहे. तिसऱ्या सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीने (Indian Captain Virat Kohli)आपल्या हस्ते थंगारासूला कॅप दिली. india vs australia 3rd odi yorker king thangarsu natarajan makes his odi debut
A massive day for @Natarajan_91 today as he makes his #TeamIndia debut. He becomes the proud owner of ? 232. Go out and give your best, champ! #AUSvIND pic.twitter.com/YtXD3Nn9pz
— BCCI (@BCCI) December 2, 2020
थंगारसूने आयपीएलच्या 13 व्या मोसमात सनरायजर्स हैदराबादकडून दमदार कामगिरी केली. हैदराबादचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापग्रस्त झाल्याने त्याला या मोसमाला मुकावे लागले. यानंतर थंगारासूने दमदार गोलंदाजी केली.
Two new faces on the field for the final #AUSvIND ODI!
?? T Natarajan makes his India debut
?? Cameron Green gets maiden Australia cap
Which newbie are you looking forward to watch? ? pic.twitter.com/fjNtfi3pVC
— ICC (@ICC) December 2, 2020
नशीब फळफळलं
खरंतर थंगारासूची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नव्हती. फिरकीपटू वरुण चक्रवर्थीची टी 20 सीरिजसाठी निवड करण्यात आली होती. मात्र चक्रवर्थी दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याच्या जागी थंगारासूला संधी मिळाली. तर थंगारासूला काही दिवसांपूर्वीच बॅकअप खेळाडू म्हणून संधी देण्यात आली.
थंगारासूची आयपीएलच्या 13 व्या मोसमातील कामगिरी
थंगारासू आयपीएलच्या 13 व्या मोसमात हैदराबादकडून एकूण 16 सामने खेळला. यामध्ये त्याने एकूण 16 विकेट्स घेतल्या. थंगारासूनं आयपीएलमध्ये एबीला यॉर्कर चेंडूवर बोल्ड केलं. तेव्हापासून थंगारासू चांगलाच चर्चेत आला.
कमरॉन ग्रीनचंही पदार्पण
ऑस्ट्रेलियाकडून कॅमरॉन ग्रीननेही एकदिवसीय पदार्पण केलं आहे.
टीम इंडियामध्ये एकूण 4 बदल
सलामीवीर मयांक अग्रवालच्या जागी शुभनम गिलला संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीऐवजी थंगारासून नटराजनला समाविष्ट करुन घेतलं आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलऐवजी कुलदीप यादव तर मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.
टी 20 मालिका
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरोधातील वनडे मालिकेनंतर टी 20 मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने खेळण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या :
india vs australia 3rd odi yorker king thangarsu natarajan makes his odi debut