India vs Australia 1st ODI Live Score update : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कमाल, भारताचा 66 धावांनी पराभव

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याला सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

India vs Australia 1st ODI Live Score update : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कमाल, भारताचा 66 धावांनी पराभव
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 5:57 PM

सिडनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) पहिला एकदिवसीय सामना पार पाडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 66 रन्सनी मात केली. त्यामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला 375 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र निर्धारित 50 षटकांमध्ये भारताला 8 विकेट्स गमावून 308 धावा करता आल्या. (India Vs Australia ODI Sydney Cricket Ground)

375 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय चांगली झाली. सुरुवातीच्या पाच ओव्हरमध्ये भारताने 50 रन्स केल्या.  परंतुला नंतर लागोपाठ अंतराने विकेट्स पडत असताना शिखर धवन आणि हार्दिक पांड्याने भारताचा डाव सावरला. शिखर धवनने 86 बॉलमध्ये 74 रन्स केल्या. तर हार्दिक पांड्याने बहारदार खेळी करताना 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 76 बॉलमध्ये 90 धावा फटकावल्या.

शिखर-हार्दिक खेळपट्टीवर असताना भारताच्या विजयाच्या आशा होत्या. मात्र शिखर आऊट झाल्यानंतर चुकीचा फटका मारुन पांड्याही बेलबाद झाला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याने आपली विकेट्स चुकीचा फटका मारुन ऑस्ट्रेलियाला बहाल केली.

भारतीय कर्णधार विराट कोहली, मयांक अग्रवाल, के एल राहुल, श्रेयश अय्यर मोठी खेळी उभारण्यात अपयशी ठरले. मयांक 22, कोहली 21, श्रेयस 2, तर राहुल 12 धावा काढून तंबूत परतले. 375 धावांच्या डोंगराचा पाठलाग करत असताना साहजिक खेळाडूंवर दडपण आलं होतं. हेच दडपण पांड्या आणि शिखर धवन वगळता दुसऱ्या खेळाडूंना झुकारुन देण्यात अपयश आलं. सरतेशेवटी भारताचा 66 रन्सनी पराभव झाला.

ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अ‌ॅडम झम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर जोश हेजलवूडने 3 घेऊन त्याला सुंदर साथ दिली. मायकल स्टार्कने 1 विकेट्स घेतली.

तत्पूर्वी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याच्या अ‌ॅरॉन फिंचचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनी सार्थ ठरवला. कर्णधार अ‌ॅरॉन फिंच आणि स्टिव्हन स्मिथने दमदार शतके झळकावली तर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी करत 19 बॉलमध्ये 45 धावा फटकावल्या. फिंच-वॉर्नर-स्मिथ आणि मॅक्सवेलच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचं लक्ष्य ठेवलं. (India Vs Australia ODI Sydney Cricket Ground)

सलामीवीर फिंच आणि वॉर्नरने अतिशय सावध सुरुवात करत 27 ओव्हरपर्यंत एकही विकेट पडू दिली नाही. तोपर्यंत दोघांनीही आपापली अर्धशतके झळकावली.  28 व्या ओव्हरमध्ये कांगारुंना पहिला धक्का बसला तो डेव्हिड वॉर्नरच्या रुपाने 76 चेंडूंमध्ये 69 धावा करुन तो बाद झाला. त्यानंतर आलेल्या स्टिव्हन स्मिथने फिंचला चांगली साथ दिली. त्यापाठोपाठ अ‌ॅरॉन फिंचने आपलं शतक पूर्ण केलं. आपल्या कारकीर्दीतलं 17 वं शतक त्याने झळकावलं. फिंचने 124 बॉलमध्ये 114 रन्स केल्या.

स्टिव्हन स्मिथने दमदार खेळी करताना 66 बॉलमध्ये 105 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत त्याने 11 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार लगावले. मॅक्सवेलनेही तुफानी खेळ केला. त्याने 19 चेंडूंमध्ये 45 धावांची खेळी केली. या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय बोलर्सचा जोरदार समाचार घेतला. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी 25 ओव्हर पार केल्यानंतर फटकेबाजी करायला सुरुवात केली. स्मिथ आणि मॅक्सवेलने आक्रमक फटके खेळून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने 76 बॉलमध्ये 69, अ‌ॅरॉन फिंचने 124 बॉलमध्ये 114, स्टिव्हन स्मिथने 66 बॉलमध्ये 105, ग्लेन मॅक्सवेलने 19 बॉलमध्ये 45 धावा काढल्या.

भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहलने 10 ओव्हरमध्ये सर्वाधिक 89 धावा दिल्या.तर मोहम्मद शमीने सर्वात कमी 53 धावा दिल्या.

[svt-event title=”भारताला सातवा धक्का, रविंद्र जाडेजा आऊट” date=”27/11/2020,5:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताला सहावा धक्का, हार्दिक पांड्या आऊट” date=”27/11/2020,5:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताला पाचवा धक्का” date=”27/11/2020,4:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हार्दिक पांड्यापाठोपाठ शिखर धवनचं अर्धशतक” date=”27/11/2020,3:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी” date=”27/11/2020,3:45PM” class=”svt-cd-green” ] 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 31 चेंडूत 50 धावा, एकदिवसीय क्रिकेटमधील 1000 धावांचा टप्पा पार [/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाला चौथा धक्का” date=”27/11/2020,3:02PM” class=”svt-cd-green” ] टीम इंडियाला चौथा धक्का, लोकेश राहुल अवघ्या 12 धावांवर बाद, (भारत – 101/4) [/svt-event]

[svt-event title=”भारताचा तिसरा शिलेदार माघारी ” date=”27/11/2020,2:43PM” class=”svt-cd-green” ] भारताचा तिसरा शिलेदार माघारी, श्रेयस अय्यर 2 धावांवर बाद (भारत 80/3) [/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाला दुसरा धक्का” date=”27/11/2020,2:40PM” class=”svt-cd-green” ] टीम इंडियाला दुसरा धक्का, कर्णधार विराट कोहली 22 धावांवर बाद (भारत 78/2)

[/svt-event]

[svt-event title=”भारताला पहिला धक्का” date=”27/11/2020,2:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का” date=”27/11/2020,12:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” शतकवीर अ‌ॅरॉन फिंच आऊट, 114 धावा करुन माघारी” date=”27/11/2020,12:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का” date=”27/11/2020,11:27AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवात” date=”27/11/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाचे अंतिम 11 खेळाडू” date=”27/11/2020,9:02AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताचे अंतिम 11 खेळाडू” date=”27/11/2020,8:56AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

आयपीएल हंगाम संपल्यानंतर टीम इंडिया लगोलग ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहचली आहे. पहिल्या मॅचच्या अगोदर टीम इंडियाने क्वारन्टाईन कालावधी देखील पूर्ण केला आहे. गेल्या काही दिवसांत टीम इंडियाच्या खेळाडूंनी कसून सराव केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यास भारतीय संघ सज्ज आहे. एकदिवसीय मालिकेत रोहितला दुखापतीमुळे वगळण्यात आलं आहे. तसेच धोनीनेही निवृत्ती घेतली आहे. अर्थात रोहित आणि धोनीची कमी या मॅचमध्ये जाणवणार आहे. त्यामुळे रोहित आणि धोनीशिवाय टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

सिडनी क्रिकेट ग्राऊंड भारतासाठी अनलकी 

टीम इंडियाची सिडनीमधील कामगिरी फारशी चांगली नाही. टीम इंडियाने आतापर्यंत सिडनीमध्ये एकूण 20 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 20 पैकी 14 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. तर केवळ 5 सामन्यात विजय मिळवता आला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

टीम इंडियाने या 20 एकदिवसीय सामन्यांपैकी 17 सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले आहेत. या 17 पैकी 14 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलंय. तर टीम इंडियाला केवळ 2 सामन्यातच विजय मिळवण्यास यश आलंय. उर्वरित 3 सामन्यांमध्ये टीम इंडियाने इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तानवर प्रत्येकी 1 वेळा विजय मिळवला आहे.

सिडनीतील अखेरच्या सामन्यातही पराभव

यजमान ऑस्ट्रेलियाने मागील दौऱ्यात भारताचा सिडनीत झालेल्या एकदिवसीय सामन्यात 34 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत टीम इंडियाला 289 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचं पाठलाग करताना टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज हिटमॅन रोहित शर्माने 133 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच महेंद्रसिंह धोनीनेही अर्धशतक ठोकलं होतं. मात्र यानंतरही टीम इंडियाला 34 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ : ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ : एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एश्टन एगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डेनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टॉर्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा

(India Vs Australia ODI Sydney Cricket Ground)

संबंधित बातम्या :

India vs Australia 1st ODI | भारत की ऑस्ट्रेलिया, वन डेमधील आकडे काय सांगतात?

India vs Australia 2020 | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, एकूण 140 वेळा आमनासामना, कोण वरचढ, कोण कमजोर?

‘गब्बर’कडून टीम इंडियाच्या नव्या जर्सीमधील फोटो शेअर, चाहत्यांकडून जुन्या संघाच्या आठवणींना उजाळा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.