हिटमॅन रोहित शर्मा 14 दिवसांपासून एकाच खोलीत! काय आहे कारण?
उर्वरित कसोटी सामने खेळायला ऑस्ट्रेलियाला पोहोचलेल्या हिटमॅन रोहित शर्मासाठी सध्याची कठीण वेळ आहे.
नवी दिल्ली : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour Of Australia) आहे. एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिका खेळल्यानंतर आता उभयतांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे (India Vs Australia). पहिल्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक पराभव झाला आहे. अशातच उर्वरित कसोटी सामने खेळायला ऑस्ट्रेलियाला पोहोचलेल्या हिटमॅन रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) सध्याची कठीण वेळ आहे. कारण ऑस्ट्रेलियात पोहचून देखील त्याला पुढचे 14 दिवस बंद खोलीत राहावे लागत आहे. (India Vs Australia Rohit Sharma 14 Days Quarantine period In Sydney)
दुखापतीच्या कारणास्तव पहिल्यांदा रोहितला संघात सामिल करुन घेतले गेले नव्हते. यावरुन जवळपास तीन आठवडे वाद सुरु होता. कर्णधार विराट कोहली पहिली कसोटी खेळल्यानंतर आता मायदेशी परतणार आहे. तर टीम इंडियाचा विकेट टेकर बोलर मोहम्मद शमी जायबंदी झाला आहे. अशातच टीमला अनुभवी खेळाडूची गरज भासणार आहे. हीच गरज पूर्ण करायला रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला गेला खरा पण कोरोना व्हायरस अजूनही आ वासून उभा आहे. त्यामुळे रोहित हॉटेलच्या बाहेर निघू शकत नाही. त्याला ऑस्ट्रेलियन सरकारचा कोरोनासंबंधीचा प्रोटोकॉल पाळावा लागणार आहे. 14 दिवसांचा क्वारन्टाईन पिरियड पूर्ण केल्यानंतर रोहितला भारतीय संघाबरोबर प्रॅक्टिस करता येईल आणि त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरोधातील टेस्ट मॅचमध्ये खेळताना दिसेल.
आपल्या खोलीमध्ये राहून रोहित शर्मा सध्या फिटनेसकडे संपूर्ण लक्ष देत आहे. यासाठी लवकर उठून तो खास व्यायाम करतो आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तो कष्ट घेतो आहे. ऑस्ट्रेलियातमध्ये कोरोना पेशंट्सची संख्या वाढायला सुरुवात झाल्याने सरकारने कोरोनासंबंधीचे काही नियम बनवले आहेत. रोहित शर्माने 5 दिवस क्वारन्टाईन पिरियड पूर्ण केला आहे. आणखी 9 दिवस त्याला बंद खोलीत राहावे लागणार आहे. शेवटच्या दोन टेस्टमध्ये रोहित शर्मा खेळताना दिसून येईल.
रोहितच्या भारतात येण्यावरुन वाद
रोहित शर्मा भारतीय संघासोबत दुबईवरुन थेट ऑस्ट्रेलियाला जाणार होता. परंतु त्याच्या वडिलांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याने तो भारतात परतला. त्यावरुन अनेक दिवस चर्चा रंगल्या. कर्णधार विराट कोहलीला याविषयी विचारला असता मला माहिती नाही, असं उत्तर त्याने दिलं.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात कांगारुंनी भारताचा धुव्वा उडवला आहे. केवळ 36 धावांत भारताला गारद करुन कांगारुंनी कसोटीतील ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. आता 26 डिसेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दुसरी कसोटी खेळली जाईल.
(India Vs Australia Rohit Sharma 14 Days Quarantine period In Sydney)
संबंधित बातम्या
Australia vs India 2nd Test | बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्यासाठी गौतम गंभीरकडून रहाणेला यशाचा मंत्र
Australia vs India | “विराट आणि मोहम्मद शमीची अनुपस्थिती टीम इंडियासाठी नुकसानकारक”