International Cricket Matches | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडिज विरुद्ध न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड ‘या’ एकाच दिवशी आमनेसामने

'या' एकाच दिवसात 2 टी 20 आणि 1 वनडे सामना खेळण्यात येणार आहे.

International Cricket Matches |  टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडिज विरुद्ध न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड 'या' एकाच दिवशी आमनेसामने
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 8:17 PM

मुंबई : कोरोनाचा फटका (Corona Virus) इतर क्षेत्रांप्रमाणे क्रीडा क्षेत्रालाही बसला होता. मात्र यानंतर हळुहळु सर्व पुर्ववत झालं. यानंतर क्रिकेट स्पर्धांच आयोजनं करण्यात आलं. दरम्यान 27 नोव्हेंबर या एकाच दिवशी तब्बल 3 सामने खेळण्यात येणार आहेत. त्यामुळे 27 नोव्हेंबर क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. पुढील आठवड्यापासून 3 सीरिजना सुरुवात होते. यामध्ये टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचाही समावेश आहे. तसेच (LPL 2020) म्हणजेच लंका प्रीमिअर लीगलाही सुरुवात होणार आहे. india vs australia south africa vs england new zealand vs west indies 27 november 2020 three international matches will be played on the same day

एकाच दिवशी 3 सामने

6 टीम येत्या 27 नोव्हेंबरला आमनेसामने भिडणार आहेत. 27 नोव्हेंबरला एकूण 3 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार आहेत. यापैकी 2 टी 20 तर उर्वरित 1 सामना हा एकदिवसीय असणार आहे. 27 नोव्हेंबरला न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज (New Zealand Vs West Indies T 20 Series) यांच्यातील टी 20 मालिकेला सुरुवात होत आहे. या सामन्याला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातही टी 20 (South Africa vs England T 20 Series) सीरिजला प्रारंभ होणार आहे. ही टी 20 मॅच रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची (India vs Australia 2020) सुरुवातही 27 नोव्हेंबरपासून होत आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 27 नोव्हेंबरपासून 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्याची सुरुवात सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे.

विंडीज विरुद्ध न्यूझीलंड T 20 मालिका

वेस्टइंडिजच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होत आहे. या मालिकेत 3 टी 20 सामने खेळण्यात येणार आहे.

1) 27 नोव्हेंबर 2020, पहिला टी 20 सामना, ऑकलंड

2) 29 नोव्हेंबर 2020, दुसरा टी 20 सामना , माउंट माउनगुई

3) 30 नोव्हेंबर 2020, तिसरा टी 20 सामना , माउंट माउनगुई

दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड टी 20 सीरिज

27 नोव्हेंबर -पहिली टी 20 मॅच- केपटाऊन

29 नोव्हेंबर 2020-दुसरा टी 20 मॅच- पर्ल

1 डिसेंबर 2020-तिसरी टी 20 मॅच-केपटाऊन

या टी 20 मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे.

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

26 नोव्हेंबरपासून एलपीएलला सुरुवात

एलपीएल स्पर्धेला (LPL 2020) 26 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत जाफना स्टॅलियन्स, दाम्बुला हॉक्स, कॅंडी टस्कर्स, कोलंबो किंग्स आणि गॉल ग्लेडिएटर्स असे एकूण 5 संघ खेळणार आहेत. कोलंबो, कॅंडी, गॉल, दाम्बुला आणि जाफना 5 जिल्ह्यांच्या नावावरुन 5 संघांचे नाव ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना कॅंडी टस्कर्स विरुद्ध कोलंबो किंग्स यांच्यात खेळला जाणार आहे. यामध्ये एकूण 23 साखळी सामने खेळले जाणार आहेत. साखळीनंतर 13 आणि 14 डिसेंबरला 2 सेमीफायनल सामने खेळण्यात येणार आहे. या सेमीफायनलमध्ये जिंकणारे संघ 16 डिसेंबरला अंतिम सामन्यात आमनेसामने भिडतील.

हे सर्व सामने श्रीलंकेतील एकूण 4 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडणार आहेत. आर प्रेमदासा आंतराराष्ट्रीय स्टेडियम कोलंबो, रनगिरी दांबूला आंतराराष्ट्रीय स्टेडियम, पल्लेकेल आंतराराष्ट्रीय स्टेडियम आणि सूर्यावेवा महिंदा राजपक्षे क्रिकेट स्टेडियम या 4 मैदानात हे सामने खेळण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या :

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा

LPL 2020 Chris Gayle | गोलंदाजांचा कर्दनकाळ युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलची लंका प्रीमियर लीगमधून माघार

india vs australia south africa vs england new zealand vs west indies 27 november 2020 three international matches will be played on the same day

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.