India vs england 1st test | इंग्लंडचा कॅप्टन जो रुटचा भीमपराक्रम, 100 व्या मॅचमध्ये धडाकेबाज शतक
जो रुटने (joe root Century) 164 चेंडूंमध्ये शानदार शतक पूर्ण केलं.
चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड ( India vs england) यांच्यातील सुरु असलेल्या पेटीएम कसोटी मालिकेतील पहिल्या सामना चेन्नईत (Chennai) खेळण्यात येत आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुट (England Captain Joe Root) याचा कसोटी कारकिर्दीतील हा 100 वा सामना आहे. त्याने या सामन्यात भीमपराक्रम केला आहे. शंभराव्या सामन्यात शतकी खेळी करण्याची कामगिरी रुटने केली आहे. रुटने 164 चेंडूंमध्ये हे शतक पूर्ण केलं आहे. रुटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 20 वे शतकं ठरलं. (India vs England 1st test 2021 england captain joe root scored hundred in 100 test match)
A hundred in his 100th Test for Joe Root ?
Outstanding knock from the England skipper.#INDvENG | https://t.co/gnj5x4GOos pic.twitter.com/KULnmIBRtA
— ICC (@ICC) February 5, 2021
रुट कसोटीतील 100 व्या सामन्यात शतक लगावणारा एकूण दहावा तर तिसरा इंग्लिश फलंदाज ठरला आहे. तसेच भारतात शंभराव्या सामन्यात शतक लगावणारा तो ओव्हरऑल तिसरा बॅट्समन ठरला आहे. याआधी पाकिस्तानच्या जावेद मियॉंदाद आणि इंझमाम उल हक या दोघांनी भारत विरोधात अशी कामगिरी केली होती.
रुटचा 100 वा कसोटी सामना
टीम इंडिया विरोधातील हा सामना रुटच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा 15 वा खेळाडू ठरला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने इंग्लंडकडून 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळण्याची कामगिरी केली आहे. कुकने इंग्लंडकडून एकूण 161 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तर अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन 158 टेस्ट खेळला आहे. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेही 144 सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच या व्यतिरिक्त इंग्लंडच्या अनेख खेळाडूंनी 100 पेक्षा अधिक सामने खेळण्याची कामगिरी केली आहे.
जो रुटची कसोटी कारकिर्द
जो रुटने आतापर्यंत एकूण 99 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 19 शतक आणि 49 अर्धशतकांसह एकूण 8 हजार 249 धावा केल्या आहेत. रुटची 254 ही कसोटीतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. रुटने टीम इंडिया विरोधात 2012 मध्ये भारत दौऱ्यावर असताना कसोटी पदार्पण केलं होतं.
संबंधित बातम्या :
India vs england 1st test | टीम इंडिया विरुद्ध मैदानात उतरताच इंग्लंडच्या जो रुटची ऐतिहासिक कामगिरी
(India vs England 1st test 2021 england captain joe root scored hundred in 100 test match)