Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England 3rd T20I | केएल राहुलची निराशाजनक कामगिरी, मालिकेत सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद

केएल राहुल (k l rahul) इंग्लंड विरुद्धच्या या टी 20 मालिकेत (india vs england 3rd t20i) दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे.

India vs England 3rd T20I | केएल राहुलची निराशाजनक कामगिरी, मालिकेत सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद
केएल राहुल (k l rahul) इंग्लंड विरुद्धच्या या टी 20 मालिकेत (india vs england 3rd t20i) दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे.
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 8:50 PM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा टी 20 सामना (India vs England 3rd T20I) खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने  टॉस जिंकून टीम इंडियाला फलंदाजीसाठी भाग पाडले. टीम इंडियाचा सलामीवर केएल राहुल (K L Rahul) नरेंद्र मोदी स्टेडिममध्ये (Naredra Modi Stadium) पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. केएल भोपळा न फोडता माघारी परतला. केएलला मार्क वुडने (Mark wood) सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर बोल्ड केलं. (india vs england 3rd t20i k l rahul out on duck)

केएलची निराशाजनक कामगिरी

केएल या टी 20 मालिकेत सातत्याने निराशाजनक कामगिरी करतोय. राहुलने पहिल्या सामन्यात अवघी 1 धाव केली. तर दुसऱ्या आणि आजच्या तिसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला. यासह केएलने एका मालिकेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याबाबत अंबाती रायुडू आणि आशिष नेहराची बरोबरी केली आहे. नेहरा 2010 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 2 वेळा शून्यावर बाद झाला होता. तर अंबाती रायुडू 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅक टु बॅक भोपळा फोडण्यात अपयशी ठरला होता.

इंग्लंडला विजयासाठी 157 धावांचे आव्हान

टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 156 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 77 धावांची खेळी केली. तसेच हार्दिक पांड्याने 17 धावा करत विराटला चांगली साथ दिली. तर रिषभ पंतने 25 धावा केल्या. इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

इंग्लंडची टीम : इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जोस बटलर, डेव्हिड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद आणि मार्क वुड.

तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत(यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल.

संबंधित बातम्या :

India vs England 2021, 3rd T20, LIVE Score | टीम इंडियाची घसरगुंडी, चौथा झटका, रिषभ पंत रनआऊट

India vs England Odi | विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वी आणि देवदत्तची धमाकेदार कामगिरी, इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळणार?

(india vs england 3rd t20i k l rahul out on duck)

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.