Special Story | India विरुद्ध England यांच्यातील वाद, जेव्हा खेळाडूच आपसात भिडले

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा खेळाडूंमध्ये हमरीतुमरी पाहायला मिळते. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातही अनेकदा सामन्य़ादरम्यान वाद झाले आहेत.

Special Story | India विरुद्ध England यांच्यातील वाद, जेव्हा खेळाडूच आपसात भिडले
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 8:58 AM

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पेटीएम कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिले 2 सामने चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आले आहेत. दोन्ही संघांनी गत कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघाचा उत्साह दुणावलेला आहे. त्यामुळे दोन्ही संघ उत्सुक आहेत. क्रिकेट सामन्यांमध्ये अनेकदा खेळाडूंमध्ये हमरीतुमरी पाहायला मिळते. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आतापर्यंत अनेकदा वादावादी झाली आहे. या मालिकेनिमित्ताने या दोन्ही संघात मैदानात झालेले वाद आपण पाहणार आहोत. (India vs England test match cricket controvresies)

विराट कोहली आणि बेन स्टोक्स आमनेसामने

इंग्लंड टीम 2016 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आली होती. या मालिकेतील मोहाली कसोटीमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि इंग्लंडचा बेन स्टोक्स (Ben Stokes)आमनेसामने भिडले होते. इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडने 4 विकेट्स गमावून 87 धावा केल्या होत्या. जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स मैदानात खेळत होते. जोडी सेट झाली होती. रवींद्र जाडेजाने ही जोडी फोडून काढली. विकेटकीपर पार्थिव पटेलने जाडेजाच्या गोलंदाजीवर स्टोक्सला स्टंपिग आऊट केलं. यामुळे विराट खूश झाला. मैदानात तो जल्लोष करायला लागला. हा प्रकार स्टोक्सला खटकला. स्टोक्सने बाद झाल्यानंतर विराटकडे वळून पाहिलं. त्यामुळे विराटही संतापला. दोघेही एकमेकांना रोखून पाहायला लागले. पण वेळीच पंचांनी मध्यस्थी केल्याने पुढील वादावादी टळली.

अँडरसनकडून धोनी आणि जाडेजासोबत गैरवर्तणूक

टीम इंडिया 2014 मध्ये इंग्लंड (England) दौऱ्यावर गेली होती. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि रवींद्र जाडेजासोबत (Ravindra Jadeja) गैरवर्तूणक केली. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी लंचची वेळ झाली. दोन्ही संघाचे खेळाडू ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाले. यावेळेस अँडरसनने धोनी आणि जाडेजाशी वादावादी करण्याचा प्रयत्न केला. अँडरसनने जाडेजाला धक्का मारल्याचा आरोप टीम इंडियाने केला. तर इंग्लंडनेही जाडेजावर आरोप केले. यामुळे जाडेजा आणि धोनीच्या  मानधनातून 50 टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली. काही न करता दंडात्मक कारवाई केल्याने टीम इंडियाचे इतर खेळाडूंना ही कारवाई सहन झाली नाही. आपल्यावर अन्याय झाल्याची भावना टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये होती.

यामुळे यावर दाद मागायची, असं टीम इंडियाने ठरवलं. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्येही कैद झाली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशीसाठी आयसीसीने एक समिती गठित केली. यानंतर या समितीकडून अँडरसन आणि जाडेजाला क्लिन चिट देण्यात आली. तसेच जाडेजाच्या मानधनातून रक्कम कापण्यात येणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

इयान बेल रन आऊट प्रकरण

जुलै 2011 मध्ये नॉटिंगघममध्ये तिसरी कसोटी खेळण्यात येत होती. या सामन्यात इयन बेलला (Ian Bell) रन आऊट दिल्याने मोठा वाद निर्माण झाला. इयन मॉर्गन आणि बेल बॅटिंग करत होते. टी ब्रेकच्या आधी मॉर्गनने जोरदार फटका मारला. हा चौकार गेला, असा समज बेलचा झाला. त्यामुळे बेल मॉर्गनसोबत क्रीझसोडून बोलत होता. मात्र सीमारेषेवरुन प्रवीण कुमारने बोल थ्रो करुन अभिनव मुकुंदच्या दिशेने फेकला. मुकुंदने त्याला रन आऊट केलं. थर्ड अंपायरनेही बेलला आऊट घोषित केलं. यामुळे इंग्लंडच्या चाहत्यांनी टीम इंडियावर सामन्यादरम्यान टीका करायला सुरुवात केली.

यावेळेस त्तकालिन कर्णधार अँड्रयू स्ट्रॉसने (Andrew Strauss) या रन आऊटबाबत कर्णधार धोनीसोबत चर्चा केली. धोनीने खिलाडूवृत्ती दाखवली. टी ब्रेकनंतर बेलला खेळायला बोलावलं. धोनीच्या या मोठेपणाचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आलं. धोनीच्या या कृतीसाठी आयसीसीने त्याला दशकातील स्पिरीट ऑफ क्रिकेट या पुरस्काराने गौरवले. धोनीला नुकताच हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

संबंधित बातम्या :

Special Story: प्रांतवादाकडून हिंदुत्वाकडे?, अयोध्येचा ‘राज’मार्ग यशस्वी होणार?; वाचा विशेष रिपोर्ट

Special Story | मुंबईकरांना भुरळ पाडणारा प्रसिद्ध ‘काळा घोडा फेस्टिव्हल’, वाचा याचा इतिहास…

(India vs England test match cricket controvresies)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.