हॉकी विश्वचषक क्वॉटर फायनलमध्ये भारतासमोर नेदरलँडचे आव्हान

भुवनेश्वर : हॉकी विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी होणाऱ्या क्वॉटर फायनलमध्ये भारत नेदरलँडशी भीडणार आहे. ‘क’ गटात साखळी फेरीमध्ये आश्वासक कामगिरी केलेल्या भारतीय संघाने कॅनडाला हरवत क्वॉटर फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. आता भारतासमोर नेदरलँडला हरवण्याचे आव्हान आहे. विश्व रँकिंगमध्ये भारताच्या एक पायरी वर म्हणजेच चौथ्या स्थानी असलेल्या नेदरलँडने ‘ड’ गटात साखळी फेरीमध्ये कॅनडाला नमवत क्वॉटर फायनलमध्ये स्थान […]

हॉकी विश्वचषक क्वॉटर फायनलमध्ये भारतासमोर नेदरलँडचे आव्हान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

भुवनेश्वर : हॉकी विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी होणाऱ्या क्वॉटर फायनलमध्ये भारत नेदरलँडशी भीडणार आहे. ‘क’ गटात साखळी फेरीमध्ये आश्वासक कामगिरी केलेल्या भारतीय संघाने कॅनडाला हरवत क्वॉटर फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. आता भारतासमोर नेदरलँडला हरवण्याचे आव्हान आहे. विश्व रँकिंगमध्ये भारताच्या एक पायरी वर म्हणजेच चौथ्या स्थानी असलेल्या नेदरलँडने ‘ड’ गटात साखळी फेरीमध्ये कॅनडाला नमवत क्वॉटर फायनलमध्ये स्थान मिळवले.

भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये आज या दोन्ही टीमचा एकमेकांशी सामना होणार आहे. जर भारत नेदरलँडला हरवण्यात यशस्वी ठरला तर सेमीफाइनलमध्ये प्रवेश घेईल. आम्ही या आव्हानासाठी तयार आहोत, असे भारतीय टीमचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांनी सांगितले.

भारतीय टीम सोबत साखळी फेरीमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाची टीम बेल्जियम असूनही भारताने पहिले स्थान गाठले. भारताने दक्षिण आफ्रिकेला पाच गोलने पराभूत केलं, तर कॅनडाला 5-1 ने मात दिली. बेल्जियमसोबतचा सामना 2-2 ने ड्रॉ झाला.

भारतीय टीमच्या सिमरनजीत सिंह, ललित उपाध्याय, मनदीप सिंह आणि ड्रैग फ्लिकर अमित रोहिदास यांनी आतापर्यंत जबरदस्त खेळ दाखवला आहे.

गुरुवारी दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मनी विरुद्ध बेल्जियम सामना रंगणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.