AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनुष्का शर्माचा कोणता सिनेमा आवडतो?, विराट कोहलीने सांगितली ‘दिल की बात!’

अनुष्का शर्माची कोणती फिल्म तुझ्या हृदयाजवळ आहे, असा प्रश्न विराट कोहलीला विचारण्यात आला. यावेळी विराटने क्षणाचाही विलंब न लावता 'ये दिल है मुश्किल' हा सिनेमा मला खूप आवडतो, असं सांगितलं. (Indian Cricket Captain Virat kohli Wife Anushka Sharma Favourite Film)

अनुष्का शर्माचा कोणता सिनेमा आवडतो?, विराट कोहलीने सांगितली 'दिल की बात!'
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा
| Updated on: May 22, 2021 | 7:54 AM
Share

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर (India tour of England) जाण्याची तयारी करतोय. त्याअगोदर कोरोना प्रोटोकॉलचं पालन म्हणून सगळे खेळाडू मुंबईत क्वारंन्टाईन होत आहेत. विराटने (Virat Kohli) इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माबद्दल (Anushka Sharma) बरेच राज सांगितले. तुला अनुष्काचा कोणता सिनेमा सर्वाधिक आवडतो? असा प्रश्न विराट कोहलीला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर विराट कोहलीने दिलं. अनुष्काचा ‘ये दिल हैं मुश्किल’ हा सिनेमा मला सर्वाधिक आवडतो, असं विराटने सांगितलं. (Indian Cricket Captain Virat kohli Wife Anushka Sharma Favourite Film)

विराटने सांगितली ‘दिल की बात!’

अनुष्का शर्माची कोणती फिल्म तुझ्या हृदयाजवळ आहे, असा प्रश्न विराट कोहलीला विचारण्यात आला. यावेळी विराटने क्षणाचाही विलंब न लावता ‘ये दिल है मुश्किल’ हा सिनेमा मला खूप आवडतो, असं उत्तर विराटने दिलं. या चित्रपटात रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांनी देखील आपल्या अभिनयाची छाप सोडलीय.

चित्रपटातील कोणता सीन आवडतो?

ऐ दिल हैम मुश्किल सिनेमातील अनुष्काच्या साकारलेल्या अभिनयाची विराटने तोंडभरुन स्तुती केली. कोहली म्हणाला मी आजही युट्यूब उघडल्यानंतर आणि मला कधी आठवण आल्यानंतर मी अनुष्काचा ऐ दिल हैम मुश्किल सिनेमातील तो सीन पाहतो जो माझ्या हृदयाजवळ आहे. “अनुष्काला कॅन्सर आहे, रणबीर कपूर तिला पाहायला परत येतो…” मी आणखीही अनुष्काला सांगतो की त्या दृश्याला जे गाणं आहे, ते माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे. अगदी मनाला भावणारं…! असे अनेक राज विराटने सांगितले.

इंग्लंड दौऱ्याची तयारी, WTC फायनल सामना

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जून दरम्यान साऊथँम्पटन येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत टी 20 आणि वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे टीम इंडियाला न्यूझीलंडचा पराभव करुन कसोटीतीलही वर्ल्ड कप जिंकायची नामी संधी आहे. हा वर्ल्ड कप उंचावण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू उत्सुक आहेत.

Indian Cricket Captain Virat kohli Wife Anushka Sharma Favourite Film

हे ही वाचा :

WTC Final : फायनलमध्ये भारताला मात देण्यासाठी……, न्यूझीलंडच्या बोलरने पुन्हा टीम इंडियाला डिवचलं!

Photo : हार्दिक पांड्याची 27 व्या वर्षी उंच भरारी, गुजरातमध्ये आलिशान घर; जीम, थिएटर आणि बरंच काही…!

जाडेजा-हार्दिकमुळे माझी आणि कुलदीप यादवची जोडी फुटली : युजवेंद्र चहल

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.